भरधाव टिप्पर घरात शिरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:09 PM2018-06-13T23:09:15+5:302018-06-13T23:09:24+5:30
रेतीचा टिप्पर अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. यात गभणे यांच्या अंगणात असलेल्या दोन दुचाकी चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेतीचा टिप्पर अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. यात गभणे यांच्या अंगणात असलेल्या दोन दुचाकी चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला.
तुमसरकडून नागपूरकडे रेती वाहून नेणारा ट्रक क्रमांक (एम.एच. ४० के ७६३९) अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. गभणे यांचे घर रस्त्याशेजारी आहे. हा ट्रक घरात शिरला त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला. नशिब बलवत्तर म्हणून गभणे कुटुंबिय बचावले. घरासमोरील दोन दुचाकींचा यात चेंदामेंदा झाला. सुदैवाने अनर्थ टळला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.
तुमसर, भंडारा व रामटेक मार्गावर रेतीची राजरोसपणे दररोज जड वाहतूक सुरु आहे. खापा येथे दररोज सकाळी व रात्रीच्या सुमारास वाहनतळ असते. भरधाव ट्रक येथून सुसाट वेगाने धावतात. भरधाव वाहनांना नियंत्रित करणारी पोलीस यंत्रणा याठिकाणी कधीही दिसत नाही. एका महिन्यापूर्वी खापा चौकात भरदिवसा रेतीच्या टिप्परने एका तरूणाचा बळी घेतला होता. खापा चौकात नियमित पोलीस चौकीची गरज आहे. परंतु पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतर काँग्रेसचे पदाधिकारी डॉ.पंकज कारेमोरे, प्रा.कमलाकर निखाडे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. अपघातस्थळी गर्दी केली होती. अनियंत्रित ट्रक चालकाविरूद्ध कारवाई करण्यात यावी आणि गभणे यांच्या घराची दुरूस्ती करण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी डॉ.पंकज कारेमोरे यांनी केली आहे.