भावी अभियंत्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:01 PM2018-09-04T22:01:00+5:302018-09-04T22:01:37+5:30
तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.
स्थानिक मनोहर भाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे केंद्र शासनाच्या विज्ञान व तकनिकी मंत्रालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे विभागीय आयुक्त आलोक मिश्रा, माझी विभागीय आयुक्त् व उद्योजकता प्रशिक्षक शुभांग गोरे, प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे उद्योग तरूण अभियंते सुरू करू शकतात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांसाठी आवश्यक असणाºया सर्व घटकांविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संस्थेद्वारे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देवून तरूण अभियंत्यांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
प्रास्ताविक प्रा. शाहीद शेख यांनी केले. दुसºया दिवशी वैभव पांडे यांनी उद्योजकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध व्यक्तीमत्व विकासाच्या पैलूंविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप्पल सिन्हा यांनी बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा व मालाचा खप कसा वाढवावा याविषयी जाणीव जागृती केली. मानवी व्यक्तीमत्वाचा उद्योगाच्या विविध घटकांवर होत असलेल्या सकारात्मक व नकारात्मक बांबींची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गडेगाव व भंडारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विविध उद्योगांना भेटी देवून तिथे प्रत्यक्षात कसे काम होते याची माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेकरिता कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख, प्रा. संजय राजुरकर, प्रा. कोमल मेश्राम, प्रणय लांजेवार, प्रा. तुषार राऊत यांनी सहकार्य केले.