जळाऊ लाकडासाठी गडेगाव डेपोचा पुढाकार
By admin | Published: February 1, 2016 12:42 AM2016-02-01T00:42:03+5:302016-02-01T00:42:03+5:30
गडेगाव लाकूड आगारातून जळावू लाकूड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे उद्घाटन गडेगाव लाकूड डेपो येथे करण्यात आले.
भंडारा : गडेगाव लाकूड आगारातून जळावू लाकूड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे उद्घाटन गडेगाव लाकूड डेपो येथे करण्यात आले.
लाखनी, गडेगाव क्षेत्रातील नागरिकांना जळाऊ लाकडासाठी जंगलात जावे लागत होते. यामुळे वृक्ष कटाईचा प्रकार वाढला होता. स्थानिकांच्या मागणीनुसार येथे जळाऊ लाकडांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. या डेपोतून मोठ्या लाकडाच्या ओडक्यांची विक्री होत होती. मात्र जळाऊ लाकूड विकले जात नव्हते. नागरिकांच्या मागणीमुळे वनविभागाने लाकडांच्या विक्रीची परवानगी आणली. ही विक्री शासकिय दराने किरकोळ स्वरुपात करण्यात येणार आहे. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी एस. आर. शेख, सरपंच गुंथारा शुभांगी सार्वे, सरपंच राजेगाव अमिता शेंडे, वनपाल ए. के. गिरीपुंजे, वनरक्षक जी.एस. गजभिये, वनरक्षक एल. टी. उचिबगले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)