बनावट नक्षल पत्रक लावणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:42+5:302020-12-27T04:26:42+5:30

रत्नाकर पतीराम पारधी (३९) रा. मोखे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यालगतच्या विर्शी, उकारा आणि ...

Gajaad who planted fake Naxal leaflets | बनावट नक्षल पत्रक लावणारा गजाआड

बनावट नक्षल पत्रक लावणारा गजाआड

Next

रत्नाकर पतीराम पारधी (३९) रा. मोखे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यालगतच्या विर्शी, उकारा आणि मोखे या तीन गावात सकाळी एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायतीच्या सूचना फलकासह भिंतीवर पत्रक चिकटविलेले आढळून आले. त्या पत्रकात ‘नक्षली आतंक, रोजगार सेवक व चपराशी अपना पद छोड दो न तो जान गवाओंगे’ असे लिहीलेले होते. ही माहिती गावात होताच एकच खळबळ उडाली. तीनही गावे नागझिरा अभयारण्याला लागून असून १५ वर्षापुर्वी या भागात नागझिरा लक्षल दलमच्या कारवाव्या झाल्या होत्या.

दरम्यान या प्रकाराची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे आणि ठाणेदार जितेंद्र बोरकर आपल्या पथकासह विर्शी, उकारा आणि मोखे येथे पोहोचले. प्रकरणाचा तपास सुरू झाला. नेमकी ही पत्रके कुणी लावली याचा शोध घेण्यात आला. दरम्यान भंडारा येथून नक्षल विरोधी पथकाचे उईकेही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मोखे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर पारधी याला ताब्यात घेतले. त्याने आपणच पत्रके लावल्याची कबूली दिली. त्याला अटक करून त्याच्याविरूद्ध भादंवि १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही पत्रके बनावट निघाल्याने पोलिसांसह गावाकऱ्यांनीही सूटकेचा निश्वास सोडला. मात्र रत्नाकरने ही फलके कोणत्या उद्देशाने लावली होती हे अद्याप पुढे आली नाही. पोलीस चौकशी लवकरच पुढे येईल, असे सांगण्यात आले.

बॉक्स

तीनही गावे नागझिरा अभयारण्यालगत

साकोली तालुक्यातील विर्शी, उकारा, मोखे ही गावे नागझिरा अभयारण्यालगत आहेत. गत १५ वर्षापुर्वी या भागात नक्षली कारवाया झाल्या होत्या. नागझिरा, दलम येथे कार्यरत होते. मात्र गत १५ वर्षात या परिसरात कोणतीही नक्षली कारवाई झाली नाही. परंतु शनिवारी सकाळी तीनही ग्रामपंचायतीच्या सूचना फलकासह भिंतीवर पत्रके आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Web Title: Gajaad who planted fake Naxal leaflets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.