महाविद्यालयात घेतला ‘गणवल’ने प्रवेश
By admin | Published: September 14, 2015 12:25 AM2015-09-14T00:25:20+5:302015-09-14T00:25:20+5:30
स्थानीय एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडी येथील इमारतीच्या प्रसाधनगृहात गणवल माशीने आपले घर तयार केले आहे.
प्राचार्यांचे दुर्लक्ष : विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात, प्राचार्यांना दिले निवेदन
मोहाडी : स्थानीय एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडी येथील इमारतीच्या प्रसाधनगृहात गणवल माशीने आपले घर तयार केले आहे. विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत असून अनेक विद्यार्थ्यांना या माशीच्या डंखापासून इजा झालेली आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास प्राचार्यांना वेळ नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत नितेश फुलेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने प्राचार्यांना निवेदन दिले.
निवेदनात महाविद्यालयीन समस्यांचा समावेश आहे. त्यात एन.जे. पटेल महाविद्यालयात खेळाचे मैदान तयार करण्यात यावे, ग्रंथालय वेळेवर उघडण्यात यावे, गणवल माशीचा बंदोबस्त करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन प्राचार्य डॉ.विलास राणे यांना देण्यात आले. यावेळी शंभरावर विद्यार्थी उपस्थित होते. या महाविद्यालयाची प्रशस्त इमारत आहे. मात्र, या इमारतीच्या सर्व देखभाल दुरुस्तीकडे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यात येत नाही. प्राचार्यांकडे तक्रार केल्यावर महाविद्यालयात फंड नाही, पैसा नाही असे उत्तर विद्यार्थ्यांना दिले जाते.
या सर्व समस्येकडे त्वरित लक्ष देऊन खेळाचे मैदान तयार करावे, ग्रंथालयाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू द्यावा व गणवल माशीपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करावे, अशी मागणी नितेश फुलेकरसह अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. समस्या त्वरीत सोडविल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)