गांधींनी भारताला आत्मभान दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:27 AM2019-05-24T00:27:38+5:302019-05-24T00:28:23+5:30
महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.
गांधी जीवन व विचार तत्त्वांच्या माध्यमातून आयोजित 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' या शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रमात अनेक वर्षे राहिलेले ज्येष्ठ गांधीवादी हिरालाल शर्मा यांनीही समयोचित विचार मांडले.
अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा होते. शिबिर संयोजक प्रा. वामन तुरिले यांनी आभार मानले. प्रास्ताविक शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी केले. याप्रसंगी जकातदारचे प्राचार्य धनराज हटवार, शिबिर निरीक्षक रणदिवे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ.विजय आयलवार, विभावरी चवळे उपस्थित होते. शिबिराचा प्रारंभ स्मिता गालफाडे आणि सुरेशराव देशपांडे यांच्या क्रांतिगीतांना चाली लावण्याने झाला. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष उद्योजक तसेच शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा यांच्या हस्ते खादीवस्त्र देऊन सुनील भाग्यवानी, मित्र सुधीर बावणकुळे, प्रा. वामन तुरिले यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणारा युवक महेश रणदिवे, आपल्या यशस्वी नेतृत्वाने 'संस्कार' चळवळीला झळाळी मिळवून देणाऱ्या, पुणे विद्यापीठाने गौरव केलेल्या शिल्पा नाकतोडे यांचा शिबिरात सत्कार करण्यात आला.