लाखो रुपयांतून गणेशपूर जि. प. क्षेत्राचा विकास
By Admin | Published: May 17, 2017 12:28 AM2017-05-17T00:28:21+5:302017-05-17T00:28:21+5:30
जिल्हा परिषद गणेशपूर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकास करण्याकरिता शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.
भूमिपूजन : विविध कामांसाठी मिळाला निधी, जया सोनकुसरे यांचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद गणेशपूर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकास करण्याकरिता शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कामांचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांच्या हस्ते पार पडला.
या विकास कामांमध्ये बेला, गणेशपूर, पिंडकेपार, कोंरभी या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा मागासवर्गीयांचा विकास व अन्य प्रकारच्या कामांसाठी हा निधी प्राप्त झाला आहे. बेला येथे १६ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात आंबेडकर वॉर्ड नाली बांधकाम, सामान्य रुग्णालय कॉलनीकरिता नाली बांधकाम, योजना नगर व राजीव नगर रस्ता खडीकरण व नाली बांधकाम करण्यात येणार आहे. गणेशपूर येथे आंबेडकर वॉर्ड नाली कव्हर, नेहरु वॉर्ड नाली बांधकाम, रस्ता खडीकरण तर कोंरभी येथे आंबेडकर वॉर्ड येथे समाज मंदिर बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, पिंडकेपार जि. प. शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला जि.प. सदस्य जया सोनकुसरे, पं.स. उपसभापती ललीत बोंद्रे, पं.स. सदस्य वर्षा साकुरे, गणेशपूर ग्रा. पं. सरपंच सविता भुरे, बेला ग्रामपंचायत सरपंच शारदा गायधने, कोरंभी सरपंच छाया वणवे, पिंडकेपार सरपंच प्रशांत रामटेके, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, अर्चना कांबळे, मनोहर नागदेवे, पिंडकेपार उपसरपंच मडावी, गोपिचंद गाढवे, रमेश लुटे, धनराज घरडे, प्यारेलाल बडोले, पुरुषोत्तम वैद्य, मनिष गणविर, क्रिष्णा गोखले, सुधा चवरे, दामिणी सडमते, सुभद्रा हेडावू, माधुरी देशकर, पुष्पलता कारेमोरे, किर्ती गणविर, मधुमाला बावनउके, संध्या बोदेले, हेमंत राकडे, बंडू सार्वे, ग्रामविकास अधिकारी शाम बिलवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.