एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:44 PM2017-12-17T23:44:51+5:302017-12-17T23:45:21+5:30

एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ....

Gangs cheating by ATMs | एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड

एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड

Next

आॅनलाईन लोकमत
साकोली : एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना साकोली पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे.
संदीपकुमार गजेसिंग (२८), प्रवीणकुमार गजसिंग (२४), सूरजमल तेलूराम (४०), रणवीरसिंह ग्यानीराम (४५) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ९८ हजार रुपये जप्त करण्यात आले. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून एटीएममध्ये येणाऱ्या लोकांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचे काम अनेक वर्षापासून करीत आहेत.
पोलिसांनी फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपासकार्य सुरु केले. सदर एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरुन या तिन्ही आरोपींची छायाचित्रे प्राप्त झाली.
त्यावरुन पोलिसांना या तरुणांचा माग काढणे सोपी गेले. साकोली पोलिसांनी सतत १४ दिवस तपासाची चक्रे वेगाने फिरवली. छत्तीसगढ पोलिसांनी दुर्ग येथे या तिन्ही आरोपींना गजाआड केले. बनावट एटीएमकार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लावल्याने या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
या कारवाईत पोलिस निरीक्षक रामेश्वर पिपरेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांच्यासह पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांनी सहभाग घेतला.
शिताफीने बदलविले होते एटीएम
आशा बोरकर (४४) रा. प्रगती कॉलनी या एकोडी येथे कामाई करंजेकर विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. त्यांना मिळालेल्या नवीन एटीएम कार्डच्या पासवर्डमध्ये बदल करण्यासाठी त्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये गेल्या. पासवर्डमध्ये बदल करीत असताना या तरुणांनी मदत करण्याच्या बहाणा केला. बोरकर यांच्याकडील एटीएम कार्ड बदली करुन शिताफीने पासवर्ड चोरी केला. परराज्यातील एटीएम मशीनमधून बोरकर यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर वळविली.

Web Title: Gangs cheating by ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.