अडीच दशकांपासून बगीचा विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:23+5:302021-02-13T04:34:23+5:30

समतानगर फेज २ मधील प्रकार भंडारा नगरपरिषद हद्दीतील समतानगर फेज २ लाला लाजपत राय वार्ड बहुचर्चित गायत्री मंदिरच्या बाजूला ...

The garden has been waiting for development for two and a half decades | अडीच दशकांपासून बगीचा विकासाच्या प्रतीक्षेत

अडीच दशकांपासून बगीचा विकासाच्या प्रतीक्षेत

Next

समतानगर फेज २ मधील प्रकार

भंडारा नगरपरिषद हद्दीतील समतानगर फेज २ लाला लाजपत राय वार्ड बहुचर्चित गायत्री मंदिरच्या बाजूला असलेला नगरपरिषदेच्या अखत्यारीतील बगीच्याचा विकास अडीच दशकांपासून होऊ शकला नाही. या प्रभागात २ नगरसेवक असून, पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली असून, नागरिकांना बगीचा विकासाची अपेक्षा आहे, परंतु असे होताना, दिसत नाही.

आता स्थितीत सदर जागेवर मोठे, खड्डे, जंगली झुडपी, झाडे, कचरा असल्याने नागरिकांना वापरता येत नाही. एकीकडे शासन वृक्ष लावा, वृक्ष जगवा मोहीम राबवित आहे, परंतु नगरपरिषदेच्या या जागेवर बगिच्यासाठी कुठलाही पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. मातीचा भरणा करून उपयोगाकरिता तयार करून द्यावा व वृक्ष लागवड करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The garden has been waiting for development for two and a half decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.