बुरखाधाऱ्यांनी पळवला रेतीचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:57 PM2018-03-10T22:57:09+5:302018-03-10T22:57:23+5:30

नियम धाब्यावर बसवून होणारी रेती चोरी आणि वाहतूक हा विषय नवीन नाही. परंतु अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Gardens cross the Sand tractor | बुरखाधाऱ्यांनी पळवला रेतीचा ट्रॅक्टर

बुरखाधाऱ्यांनी पळवला रेतीचा ट्रॅक्टर

googlenewsNext
ठळक मुद्देवरठी हद्दीतील घटना : तपासणी पथकावर वाहन नेण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमत
वरठी : नियम धाब्यावर बसवून होणारी रेती चोरी आणि वाहतूक हा विषय नवीन नाही. परंतु अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहाडीचे तहसीलदारांनी पकडलेले ट्रॅक्टर फिल्मी स्टाईलने चार बुरखाधारी युवकांनी पळवून नेऊन अंगावर गाडी नेण्याच्या प्रकरणाने अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. या प्रकरणातील आरोपीना वरठी पोलिसांनी अटक केली आहे.
मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील व वरठीचे तलाठी पराग तितिरमारे हे आपल्या पथकासह अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या तपासणीसाठी वरठी येथील जगनाडे चौकातील पांढराबोडी रस्त्यावर उपस्थित होते. दरम्यान त्यांना ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एल ३४८७ मध्ये रेती वाहतूक होताना दिसली. तपासणी पथकाने वाहन थांबवून तपासणी करीत आवश्यक कागदपत्रे मागितले असता ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर थांबवून पळून गेला. काही वेळातच तो आपल्यासोबत चार बुरखाधारी युवकांसह घटनास्थळावर आला.
तहसीलदार व तपासणी पथकासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. हे सर्व सुरु असताना त्यातील एका युवकाने ट्रॅक्टर सुरु करून रस्त्याच्या कडेला रेतीचे ट्रॅक्टर खाली करून वाहन सरळ अधिकाऱ्याच्या दिशेने वळवले. त्यावेळी तपासणी पथकाच्या कर्मचाºयांनी रस्त्याच्या कडेला उडी घेऊन जीव वाचवला. रस्त्यावर उभे असलेले तहसीलदार यांचे वाहनाला जोरदार कट मारून आरोपींनी ट्रॅक्टर पळवून नेला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना प्रत्यक्षात अनुभवल्याने काही काळापुरते तपासणी पथकाला धडकी भरली. काही कळायच्या आत फिल्मी स्टाईलने काही युवक येतात आणि कुख्यात गुंडप्रमाणे हुज्जत घालून ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेतात. या प्रकरणाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फोडले होते. झालेला प्रकार पाहून स्तब्ध झालेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताानाही घाम फुटला होता.
रेती चोरी आणि वाहन पकडल्या गेल्यास त्यांच्यावर होणारी कारवाई हे नित्याचे प्रकार आहेत. पण तपासणी अधिकाºयाच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने वाहन पळवणे हे प्रकार नवीनच आहे. याप्रकरणामुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. सध्या स्थित जिल्ह्याला रेती माफियांची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास येत असून चोरी व उलट मुजोरीच्या प्रकरणामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Gardens cross the Sand tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.