घरकूल लाभार्थ्यांना वारपिंडकेपारची रेती
By admin | Published: February 2, 2015 11:00 PM2015-02-02T23:00:43+5:302015-02-02T23:00:43+5:30
सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम
चुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरातील नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना वारपिंडकेपार गावातील घाटावरून रेतीची आयात करावी लागत आहे. यामुळे घरकुलांची बांधकाम अडचणीत आले आहेत. यामुळे शासन विरोधात गावकरी असा वाद पेटणार आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोरे आहेत. या नद्यांच्या काठावर अनेक गावांचे वास्तव्य आहेत. नद्यांच्या पात्रात दर्जेदार रेती असल्याने देशाची राजधानी दिल्लीत मागणी आहे. कॉमनवेल्सच्या बांधकामात हीच रेती उपयोगात आणण्यात आली आहे. परंतु या परिसरात वारपिंडकेपार गावातील रेतीघाट लिलावात काढण्यात आले आहे. अन्य गावात रेतीघाट लिलावात काढण्यात आले नाही. यात देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, महालगाव, सोंड्या गावाचा समावेश आहे. दरम्यान याच गावात रेतीचा भंडार आहे. गाव शेजारी असणाऱ्या पात्रातून रेतीचा उपसा केल्यास रेती स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. परंतु या अनधिकृत रेती उपसा करताना बंदी लावण्यात आली आहे. या शिवाय ट्रॅक्टर वाहतुक करताना आढळून आल्यास दंड अथवा फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे ट्रॅक्टर मालक धस्तावली आहेत. दरम्यान या नद्यांच्या काठावरील गावात गरीबांना घरकुल मंजुर करण्यात आली आहे. दलित बांधवांना रमाई आवास योजनेच्या घरकुले देण्यात आली आहे. वाढत्या माहागाईत घरकुल बांधकामाचा अनुदान अल्प आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अन्त्योदय यादी उदरनिर्वाह करणारे कुटूंब या योजनेत पात्र करण्यात आले आहेत. घरकूल बांधकामाचा अनुदान सव्वा लक्ष रूपयाच्या घरात आहे. या दरवाढीत अनुदान राशीत एकाच खोलीचे बांधकाम करणे शक्य आहे. सध्यास्थित विटा, सिमेंट, लोखंड तथा कारागिराचे दर वाढले आहे. घरकुल बांधकाम निधीची जुळवा जुळव करीत असताना पुन्हा रेती महागली आहे. यामुळे गरीब घरकुल लाभार्थी चांगलेच चक्रावली आहेत.
गावात नदीचे पात्र असताना वारपिंडकेपार गावातून रेतीची आयात करण्याची पाळी या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून अनधिकृत रेतीचा उपसा करताना कारवाईचा बडगा आहे. यामुळे गावकरी गांगरली आहेत. यामुळे गरिबांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. घरात अन्न धान्य असताना उपाशी झोपण्याची वेळ या घरकुल लाभार्थ्यावर आली आहे. गावातील पात्रातून रेतीचा उपसा करण्याची सुट देण्याची ओरड घरकुल लाभार्थी करीत आहेत. या गावापासून रेतीघाट लांब पल्ल्याच्या ठिकाणी आहेत. या घाटावरून रेतीची आयात करताना गरीब घरकूल लाभार्थ्यांना परवडणारी नाही. अंदाजे दोन हजार रूपये ट्रॅक्टर प्रती ट्रिप मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांचे लचके तोडले जाणार आहेत. दरम्यान अनधिकृत रेतीचा उपसा तथा चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिवसभराचे कामकाज सोडून रेती घाटावर फेरफटका मारत आहेत. रात्री जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांची असणारी गस्त, नागरिकांना वाऱ्यावर सोडून रेतीघाट पिंजून काढत आहेत. यामुळे गावा गावात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. गावात पोलिसांचा धाक नाही. रात्री होणारी रेतीची चोरी थांबविण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. यामुळे जनतेपेक्षा रेती महत्वाची असल्याचे परिसरात दिसूनयेत आहे. लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करण्यासाठी गरज आहे. (वार्ताहर)