भंडारा जिल्ह्यात मेघनाथ यात्रेसाठी दीडशे बैलजोड्यांनी खेचून आणला गरदेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:49 AM2019-03-13T11:49:44+5:302019-03-13T11:50:28+5:30
धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला.
राहूल भुतांगे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला. सव्वाशे वर्षांची ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी विदर्भ व महाराष्ट्रातील भविकांनी एकच गर्दी केली होती.
तुमसर तालुक्यातील आष्टी गावात १२५ वर्षापासून धुलीवंदनाच्या दिवशी गरदेव मेघनाथची यात्रा भरते. दर तीन वर्षांनी गरदेवासाठी लागणाºया लाकडाला गावातील बैल जोड्यांच्या सहाय्याने जंगलातून खेचून आणले जाते. आष्टी व परिसराला दुष्काळापासून बचाव करण्यासाठी मेघनाथाची पूजा केली जाते. त्यासाठी गरदेवरूपी ७० ते ८० फूट उंच जोडीने असलेल्या वृक्षांची निवड केली जाते. त्याला नर-मादी म्हणतात. या वृक्षांची सावली एकमेकांवर पडणारेच वृक्ष निवडले जातात. त्यासाठी जंगलात पुजाºयाच्या मदतीने वृक्षांचा शोध घेतला जातो. एकदा असा वृक्ष सापडला की त्याला गरदेव म्हटले जाते. हा गरदेव बैलजोड्यांच्या सहाय्याने खेचून आणत. गरदेव रुसला तर १५० बैलाची शक्तीही त्या लाकडाला हलवू शकत नाही, असे गावकरी सांगतात. त्यावेळी गरदेवाला प्रसन्न करण्यासाठी शंभर ते सव्वाशे नारळ फोडून पूजा केली जाते. त्यानंतर गरदेव पुढे सरकतो. जंगलातून यात्रा स्थळापर्यंत गरदेव आणण्यासाठी दोनही लागतात. मंगळवारी आष्टा येथील गावकरी गरदेवला आणण्यासाठी जंगलात पोहचले असून सजविलेल्या दीडशे बैलजोडीच्या मदतीने त्याल खेचून आणले. हा सोहळा पाहण्यासाठी विदर्भ व मध्यप्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.