गर्रा बघेडा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार
By admin | Published: January 1, 2015 10:56 PM2015-01-01T22:56:20+5:302015-01-01T22:56:20+5:30
गर्रा बघेडा हे गाव जंगल व डोंगरांनी व्याप्त असल्याने गावकऱ्यांची तयारी असल्यास या गावाला ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करणार. जलाशयाचे खोलीकरण करून विविध जल क्रीडा,
नाना पटोले : आढावा बैठकीत गावाच्या विकासावर चर्चा
भंडारा : गर्रा बघेडा हे गाव जंगल व डोंगरांनी व्याप्त असल्याने गावकऱ्यांची तयारी असल्यास या गावाला ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करणार. जलाशयाचे खोलीकरण करून विविध जल क्रीडा, जवळील जंगलात व टेकडीवर ट्रेकींग, पॅरारायडींग व तत्सम आधुनिक क्रीडा प्रकारासाठी सुविधा उपलब्ध करून गावाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. म्हणजे येथील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून अस्तित्वात आलेली सांसद आदर्श ग्रामयोजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खा.नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांचे समवेत विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आदर्श ग्राम गर्रा - बघेडा येथे गावाच्या विकास कामासंबंधी नुकतीच आढावा बैठक घेतली. बावनथडीचे पाणी या गावाच्या १५० हे.आर. शेत जमिनीला त्वरीत सोडण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना त्वरीत विद्युत कनेक्शन देण्याचे निर्देश खा.पटोले यांनी दिले.
दुग्ध विकास अधिकाऱ्यांना गावात १ हजार लिटरचे होत असलेले दुग्ध उत्पादन वाढवून या गावात दुग्ध संकलनासाठी त्वरीत दुग्ध सहकारी संस्था स्थापन करावे. तसेच पशु संवर्धन अधिकाऱ्यांना गावातील जनावरांचा विमा काढून तयंच्या करीता संवर्धन करण्यास सांगितले. त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश व ते मंजूर करण्याचे आश्वासन खा.पटोले यांनी दिले. जंगलातील मोहाची व चारोळीच्या वृक्षांची जतन करावे. तसेच तेंदूपत्ता मजूरांचा प्रलंबित बोनस त्वरीत वाटप करावे. गावातील जल संवर्धनासाठी विविध पाणी साठवण तलाव, बंधारे, कोल्हापूरी बंधारे यांची दुरुस्ती व गाळ काढण्यात यावे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना त्वरीत क्रीडा संकुल व व्यायामशाळेसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, बांधकामाचे प्रस्ताव, गं्रथालय विभागाला अत्याधुनिक ग्रंथालय व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकक्ष बांधण्यासाठी प्रस्ताव तसेच ग्रामविकास यंत्रणा, प्रकल्प अधिकाऱ्यांना महिला व पुरुष बचत गटांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व निधी उपलब्ध करून द्यावे, तसेच तहसीलदारांनी समाधान शिबिरासारखे तत्सम शिबिर लावून गावकऱ्यांचे राशन कार्ड नुतनीकरण, नवीन राशन कार्ड, विभक्तीकरण, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना व तत्सम योजनासंबंधी आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ गावातच येवून देण्याचे निर्देश खा.पटले यांनी दिले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश पारधी, तुमसर पंचायत समितीचे सभापती कलाम शेख, जि.प. सदस्य अशोक उके, रहांगडाले, खंडविकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच तरटे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)