गॅस सिलिंडर गोडाऊनमुळे वाहतुकीचा धोका बळावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:28 AM2019-09-06T01:28:41+5:302019-09-06T01:29:38+5:30

इंडियन गॅस कंपनीचा भरलेला ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा करून तिथेच पिरमीड गॅस एजन्सीची गाडी आठवडाभर भरला जात आहे. हा प्रकार गत सहा ते सात महिन्यांपासून सतत सुरु आहे. सिलिंडरने भरलेला ट्रक गोडावूनमध्ये खाली न करता सरळ दुसऱ्या गाडीमध्ये भरत असते.

The gas cylinder Godown increased the risk of transportation | गॅस सिलिंडर गोडाऊनमुळे वाहतुकीचा धोका बळावला

गॅस सिलिंडर गोडाऊनमुळे वाहतुकीचा धोका बळावला

Next
ठळक मुद्देखरबीतील प्रकार : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे इंडियन गॅस एजन्सीचे गोडावून राष्ट्रीय महामार्गालगत ५० मीटर अंतरावर आहे. पिरमीड इंडियन गॅस एजन्सी भंडारा शहरात स्थानिक आहे. खरबी परिसरात इंडियन गॅस एजन्सीचे ग्राहक बोटावर मोजण्याइतके आहेत. संपूर्ण ग्राहक भंडारा शहरात आहे.
इंडियन गॅस कंपनीचा भरलेला ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा करून तिथेच पिरमीड गॅस एजन्सीची गाडी आठवडाभर भरला जात आहे. हा प्रकार गत सहा ते सात महिन्यांपासून सतत सुरु आहे. सिलिंडरने भरलेला ट्रक गोडावूनमध्ये खाली न करता सरळ दुसऱ्या गाडीमध्ये भरत असते. या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अचानक अपघात घडल्यास सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा मोठ्या प्रमाणात स्फोट होण्याची शक्यता बळावली आहे. जर स्फोट झाल्यास शेजारी असलेल्या घरांना व परिसरात नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. पण या प्रकाराकडे पिरमीड गॅस एजन्सीने दुर्लक्ष केले आहे.
या एजन्सीला राष्ट्रीय महामार्गावर गाडी खाली करण्याचे परवाना कुणी दिला, यावर प्रश्न निर्माण झाला आहे. जर अपघात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार, असे अनेक प्रश्न जाणाºया येणाºया खरबीवासीयांच्या मनात निर्माण होत आहे.

अपघाताची जबाबदारी कोण घेणार?
महामार्गावरच ट्रक, पिकअप वाहने, आॅटोरिक्षा तासन्तास उभे करून गॅस एजन्सीचे चालक गाड्या उभ्या करतात. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वेगाने जाणाºया गाड्यांचे अपघात झाल्यास येथे मोठा प्रचंड स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एजन्सी गोडावूनपासून काहीच अंतरावर घरे असल्याने अनेकांच्या जिवीताचा धोका असल्याची भीती खरबी नाका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे..

Web Title: The gas cylinder Godown increased the risk of transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.