गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले, आता मोजा 921 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 05:00 AM2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:30+5:30

विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्या भाववाढीने अनेकांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. गत वर्षभरात गॅस सिलिंडरचे भाव ४३६ रुपयांनी वाढले. तर सबसिडी मात्र कमी झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

Gas cylinders went up by Rs 25 again, now at Rs 921 | गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले, आता मोजा 921 रुपये

गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले, आता मोजा 921 रुपये

Next

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. मागील महिन्यात पन्नास रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती प्रति सिलिंडरमागे ९२१ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. विशेषत: सबसिडीमध्ये मात्र काहीच वाढ झाल्याचे दिसून येत नाही. याचा सरळ सरळ फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसणार आहे. एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असताना दुसरीकडे सातत्याने सबसिडी घटत आहे. जनसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून, त्यात सिलिंडरच्या भाववाढीने अनेकांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. गत वर्षभरात गॅस सिलिंडरचे भाव ४३६ रुपयांनी वाढले. तर सबसिडी मात्र कमी झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच 

- जुलै २०२० मध्ये सिलिंडर ४६० रुपयांना मिळत होता. त्यानंतर सातत्याने गॅसच्या किमतीत वाढच होत गेली. जुलै २०२१ मध्ये गॅस सिलिंडर ८९४ रुपयांत उपलब्ध झाला होता. या महिन्यात २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ९२१ रुपये मोजावे लागणार आहेत. याचा फटका सर्वांना बसत आहे.

छोट्या सिलिंडरचे दर जैसे थे 
- जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या प्रमाणात छोट्या सिलिंडरलाही मागणी आहे. सद्य:स्थितीत पाच किलोचा छोटा सिलिंडर ३३९ रुपयांना मिळत आहे. घरगुती गॅसच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र छोट्या सिलिंडरच्या दरात सध्यातरी कुठलीही वाढ झाल्याचे दिसून येत नाही. हा थोडासा दिलासा लहान सिलिंडर वापरकर्त्यांना मिळाला आहे.

 

Web Title: Gas cylinders went up by Rs 25 again, now at Rs 921

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.