निर्माणाधीन गेटला गौतम बुद्ध द्वार नाव देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:53+5:302021-09-25T04:38:53+5:30
निर्माणाधीन गेटचे ‘गौतम बुद्ध द्वार’ असे नामकरण १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिलेल्या कुऱ्हाडा तलावाचे पाळीवर डॉ. ...
निर्माणाधीन गेटचे ‘गौतम बुद्ध द्वार’ असे नामकरण १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिलेल्या कुऱ्हाडा तलावाचे पाळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व तलावाला ‘भीम सरोवर’ असे नाव देण्यात यावे, बाल समुद्र तलावात ५० मीटर लांबीचा पूल बांधून स्व. मयूर गुरुजी यांचे जुने घर ते जगन्नाथ मंदिराचे बाजूने असणाऱ्या सिरसाळा- कन्हाळगाव रस्त्याला जोडणारा रस्ता तयार करून बाल समुद्र तलावाचे सौंदर्यात भर घालण्यात यावी. तसेच वैनगंगा नदीवर ऐतिहासिक काळात बांधण्यात आलेल्या दिवानघाट, पानखिडकी व घोडेघाट हे तिन्ही घाट शंभर मीटर अंतरावर असल्याने सर्व दुरुस्त करून एका मार्गाने जोडण्यात यावे. पवनीच्या पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मागण्यांचे निवेदन बुद्धविहार समिती पवनीचे सदस्य विकास राऊत, शैलेश मयूर व प्रेम सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.
240921\1758-img-20210924-wa0014.jpg
नगर परिषद पवनी चे मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना बुद्ध विहार समिती चे सदस्य.