सात दशकांपासून गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:18+5:302021-02-26T04:49:18+5:30
तुमसर: स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तुमसर तालुक्यातील गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळाला नाही. चार ते पाच गावे मिळून एक ग्रामपंचायत ...
तुमसर: स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तुमसर तालुक्यातील गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळाला नाही. चार ते पाच गावे मिळून एक ग्रामपंचायत येथे आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती. आता प्रत्येक गावची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे गठण करणे आवश्यक आहे.मात्र, याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
ग्रामस्थांना दोन ते पंधरा किलोमीटरपर्यंत प्रशासकीय कामाकरिता जावे लागत असून परिणामी गावविकासाला खीळ बसत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक गावात ग्रामपंचायती निर्माण करण्यात आली. परंतु, ५०० लोकसंख्या असलेल्या गावांसाठी एक ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली. दोन ते दोनपेक्षा जास्त गावे गटग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही गटग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. सध्या प्रत्येक गावची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यातील पवनारखारी ही गटग्रामपंचायत असून गणेशपूर, चांदमारा या गावांचा समावेश आहे. येदरबुची, सुंदरटोला, गुडरी, धामणेवाडा सौदेपुर, लेंडेझरी, पांगडी, लवादा, मंगरली, आलेसुर, खापा, विटपूर, गोंडीटोला, पिपरिया, गोवारीटोला, मंडेकसा, गायमुख, सोनपुरी, अंबागड, दावेझरी, रामपूर, रामपूर, हमेशा, धुटेरा, घानोड सक्करदरा, हिरापूर, हमेशा ही गावे गटग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट आहेत. यातील काही ग्रामपंचायतींचे अंतर २ ते १५ किलोमीटर आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ग्रामस्थांना येथे जाण्यास मोठी अडचण निर्माण होते.
गायमुख यात्रा येथे भरते ते रामपूरहमेशा गाव अंबागड ग्रामपंचायतीअंतर्गत येते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.