पावसाच्या हजेरीने हलक्या धानाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:03 AM2017-09-10T00:03:20+5:302017-09-10T00:04:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गत आठ दिवस तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. ऐन गरजेच्यावेळी ९ ला दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी वर्ग सुखावला. हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.
गेल्या आठवडाभर कडक ऊन पडत होते. उन्हामुळे शेतातील पाणी आटलेले होते. दोन तीन दिवसापासून शेतकरी विहीर, शेततलाव, नहराचे व ओढ्याचे उपलब्ध असलेले पाणी शेतात देण्याचे काम करू लागले होते. अशावेळी बºयापैकी पाऊस आल्याने शेतकरी सुखावला व हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.
विरली : तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शनिवारला दुपारपासून हजेरी लावणाºया पावसाने शेतकरी सुखावला आहे. सद्यस्थितीत हल्के धान गर्भावस्थेत तर काही निसवण्याच्या मार्गावर आहेत. या अवस्थेत धान पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आज झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकºयांनी सुटकेचा विश्वास टाकला असून ऐन वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी आनंदात आहेत.
१५ दिवसानंतर पावसाची हजेरी
पालांदूर : परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर पाऊस रजेवर गेला होता. धानपिकाला पावसाची नितांत गरज होती. उकाड्याने धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. किडनाशक फवारणीकरीता सुद्धा बांध्यात पाणी नव्हता. धानपिक गर्भात असून जमिनीला भेगा पडल्या होत्या. शनिवारला सायंकाळी ४ च्या सुमारास वरूणराजा प्रसन्न झाला व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे गर्भावस्थेतील धानाला मोठी मदत झाली. कोरडवाहू शेतीतील धान सुकण्याच्या स्थितीत असताना पावसाच्या हजेरीने धानपिकाला पुनर्जीवन मिळाले.