गायत्री परिवाराने संस्कारक्षम पिढी निर्माण केली
By Admin | Published: June 7, 2017 12:32 AM2017-06-07T00:32:48+5:302017-06-07T00:32:48+5:30
गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थिती हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
परिणय फुके : सभामंडपासाठी सात लाखांच्या निधीची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थिती हा एक ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्राच्या विकासाकरिता युवावर्ग, महिला वर्गाला संघटीत करून धार्मिक व आध्यात्यमिक ज्ञानाची जाणीव करून देण्यासाठी गायत्री परिवाराचे मोठे योगदान आहे. राष्ट्रनिर्माण, धर्मसंस्कृती याची जाणिव परिवाराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.
माँ गायत्री मूर्ती व प्राणप्रतिष्ठा व पंचकुंडीय गायत्री महायज्ञ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, नागपूरच्या नगरसेविका डॉ.परिणीता फुके, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश बांते, गौरीशंकर देशकर, गणेशपूर ग्राम पंचायत सदस्य शेखर खराबे, आरती भैरम उपस्थित होते.
देवस्थापना, गायत्री महायज्ञ व गायत्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फुके यांनी, गायत्री मंदिराच्या सभामंडपासाठी सात लाखांचा निधी स्थानिक निधीतून देण्याचे आश्वासन दिले. आजच्या आधुनिक युगात राष्ट्रधर्म संस्कृतीचे चांगले विचार लोप पावत आहे. नव्या पिढीत चांगले संस्कार घडविण्यासाठी स्वच्छ चरित्र, स्वच्छ मन गायत्री परिवारामुळेच चांगला समाज निर्माण करता येईल. देवसंस्कृतीची जाणीव यासाठी पंचकुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. गायत्री मातेची प्राणप्रतिष्ठामुळे परिसरात चांगला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी, गायत्री परिवारामुळे राष्ट्र विकास व अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आध्यात्मिक, जीवन एक प्रेरणादायी आहे. गायत्री मातेचे प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक क्षण आहे. येथे आदर्श व्यक्तीमत्व व आदर्श जीवन व लोकहितार्थ कार्य करण्याची प्रेरणा भक्तजनांना मिळणार आहे. गर्भसंस्कार शिबिर, कार्यशाळा हे बळ देण्याचे काम आपले भाऊ - बहिण व वडीलधारी बांधव करीत आहेत असे प्रतिपादन केले. संचालन अरुण मरघडे यांनी केले. आभारप्रदर्शन सुधाकर शेंदरे यांनी केले. माँ गायत्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सहकार्य केले.