देशविदेशात गाजविले कार्यक्रम
By admin | Published: November 19, 2015 12:30 AM2015-11-19T00:30:21+5:302015-11-19T00:30:21+5:30
कौशिकी यांनी वयाच्या ७ व्या वर्षीपासून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
देशविदेशात गाजविले कार्यक्रम
कौशिकी यांनी वयाच्या ७ व्या वर्षीपासून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जोगमायादेवी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तत्त्वज्ञान या विषयात प्रथम श्रेणी डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपल्या गायकीचा स्वतंत्र ठसा उमटविला. अनेक मोठ्या संगीत समारोहातून कौशिकी यांनी आपल्या गायकीने रसिकांंना मंत्रमुग्ध केले. मुख्यत्वे करून भारतातील आयटीसी संगीत संमेलन, कॅलिफोर्नियाचा स्प्रिंग फेस्टिव्हल आॅफ म्युझिक, लॉसएंजिल्सचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव या सारखे भव्यदिव्य कार्यक्रमांचा समावेश आहे.
कौशिकी चक्रवर्ती यांंना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. त्यात १९९५ सालचा जाडू भट्ट, २००० साली आऊट स्टॅन्डींग यंगपर्सन, २००५ साली बीबीसी अवार्ड संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक बांगला व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायनही केले आहे. अशा या शास्त्रीय गायिका आपल्या असामान्य गायन शैलीची जादू यवतमाळकरांवर टाकणार आहे.