राजपत्रित महिला कर्मचाºयांचा ‘लक्षवेध दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:18 PM2017-11-11T23:18:24+5:302017-11-11T23:18:45+5:30
राज्यशासनातील महिला कर्मचाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघातर्फे दुर्गा महिला मंच कार्यरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यशासनातील महिला कर्मचाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघातर्फे दुर्गा महिला मंच कार्यरत आहे. महिला अधिकारी कर्मचाºयांच्या प्रश्नाकडे शासन प्रशासनस्तरावरून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध दिन पाळला.
या लक्षवेध दिनानिमित्त महिला कर्मचाºयांसमोर उभ्या ठाकणाºया समस्यांचा निपटारा करावा व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. मागण्यांमध्ये केंद्र शासनाने बाल संगोपन रजा त्यांच्या महिला कर्मचाºयांसाठी २००८ पासून लागू केलेली आहे. महिला कर्मचाºयांना सेवेच्या कालावधीत ७३० दिवसांची रजा घेता येते. सदर रजा दोन अपत्यांच्या संगोपनासाठी असून मुले १८ वर्षाची होईपर्यंत सदर रजेचा लाभ देय आहे.
सदर रजा वर्षातून केवळ तीन वेळा घेण्याची तरतूद आहे. महिला रजेवर गेल्यास कामकाजावर परिणाम होईल.
या भीतीपोटी महिलांना सलग सुट्यांचा लाभ देण्यास कार्यालय प्रमुख पुढाकार घेत नसल्याच्या या माध्यमातून निदर्शनास आणून दिले.
महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रेल्वे, बसने प्रवास करणाºया महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष रेल्वे व बसची सुरुवात करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, वनिता सार्वे, उषा कुडवे, शामकला पंचभाई, मनिषा कुरसंगे, पौर्णिमा गजभिये, रुपाली भोरमार, प्रमिला पटले यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी उपस्थित होत्या.