ओम सत्यसाई महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:57+5:302021-09-04T04:41:57+5:30
जवाहरनगर : ओम सत्यसाई कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय परसोडी (ठाणा) येथे वर्ग ११वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक ...
जवाहरनगर : ओम सत्यसाई कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय परसोडी (ठाणा) येथे वर्ग ११वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक असलेल्या सामान्य ज्ञानाची तपासणी करण्यासाठी गणित व विज्ञान सामान्य ज्ञान परीक्षांचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेला एकूण १९० विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचे आयोजन ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालयातर्फे करण्यात आले.
या परीक्षेत परीक्षकांचे काम प्रा. ज्योती रामटेके, प्रा. चेतन हटवार, प्रा. प्रतीक घुले, प्रा. सोहम वासनिक, प्रा. हर्षानंद वासेकर, प्रा. वर्षा दंडारे, प्रा. अरविंद डोंगरे, प्रा. मिथुन मोथरकर, प्रा. वर्षा भुरे यांनी पाहिले. परीक्षेसाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ही परीक्षेचे आयोजन कोविड-१९च्या सर्व मार्गदर्शक नियमांचे व सूचनांचे पालन करून करण्यात आले.