परिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:04 PM2019-02-11T23:04:22+5:302019-02-11T23:04:38+5:30

कोका गावाच्या विकासात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गावात अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांची धडपड असते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आज त्यांच्या कर्तव्यामुळे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरुणानों, परिवर्तनाच्या लढाईसाठी तयार व्हा, गावाच्या विकासाला लागणाºया निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी, शेतमजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Get ready for the transformational battle | परिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा

परिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : कोका ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका गावाच्या विकासात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गावात अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांची धडपड असते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आज त्यांच्या कर्तव्यामुळे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरुणानों, परिवर्तनाच्या लढाईसाठी तयार व्हा, गावाच्या विकासाला लागणाºया निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी, शेतमजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
कोका येथे शनिवारी नवनिर्मित ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या इमारतीचे उद्घान खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, नरेश डहारे, गजानन झंझाड, राजेश हटवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हितेश सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, सुजाता फेंडर, बालू ठवकर, प्रभुजी फेंडर, हेमंत बांडेबुचे, रामकृष्ण बेदरकर, लोकेश खोब्रागडे, अतुल तिडके, कोकाचे सरपंच संजय इळपाते, उपसरपंच रवींद्र तिडके, ग्रामसेवक डी.एच. जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभारे, उषा चौधरी, जयश्री हातझाडे, सरीता कोडवते, वैशाली हातझाडे उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले गावाचा विकास हा गावकºयांच्या हाती असतो. गावकºयांनी मनात घेतले तर गावांचा कायापालट करता येते. हे कोका येथील नागरिकांनी सिध्द करुन दाखविले आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घेवून विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार कुकडे यांनी कोका ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या विकास कामांप्रती असलेल्या तळमळीची प्रशंसा केली. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सर्वांची साथ घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लखनिय कार्य करणाºया मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रम शाळा, इंदिरा हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकले. यावेळी कोकासह परिसरातील गावातील सरपंच व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Get ready for the transformational battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.