जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:55 PM2018-08-12T21:55:48+5:302018-08-12T21:56:09+5:30
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व भंडारा शहर रेल्वे स्थानक बनविण्यात यावे, या मागण्यांच्या संदर्भात भंडारा जिल्हा रेलयात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व भंडारा शहर रेल्वे स्थानक बनविण्यात यावे, या मागण्यांच्या संदर्भात भंडारा जिल्हा रेलयात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.
समितीचे सचिव रमेश सुपारे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने पोस्ट आॅफीसमध्ये रेल्वे आरक्षण केंद्र, रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस चौकीची स्थापना गीतांजली व आझाद हिंद एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याचे सांगून, भंडारा शहर रेल्वे स्टेशनसाठी प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. भंडारा शहर रेल्वे स्थानकाचे कार्य व जलदगती गाड्यांचे थांबे मिळण्याचे काम खोळंबल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून दिले. रेल्वे बोर्डच्या अधिकाºयांशी प्रत्यक्ष चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली.
सेवक कारेमोरे यांनी फुटब्रिजच्या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधले तर विजय खंडेरा यांनी जलद गती गाड्यांचे थांबे मिळावेत अशी मागणी केली. समितीने मागण्यांचे कनवेदनही त्यांना सादर केले. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व बाबी ऐकून घेतल्या व आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन समितीला दिले. यावेळी समितीचे पदाधिकारी सेवक कारेमोरे, रमेश सुपारे, विजय खंडेरा, डी.एफ. कोचे, हिवराज उके, सुरेश फुलसुंगे, वरियलदास खानवानी उपस्थित होते.