विद्यार्थ्यांच्या असंतोषावर दाद मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 12:43 AM2016-10-21T00:43:39+5:302016-10-21T00:43:39+5:30
समर्थ महाविद्यालय, येथे विद्यार्थ्यांच्या असंतोषावर दाद मिळावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
विद्यार्थ्यांची मागणी : कुलगुरूंना सोपविले निवेदन
लाखनी : समर्थ महाविद्यालय, येथे विद्यार्थ्यांच्या असंतोषावर दाद मिळावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी दाद मागीतली आहे.
विद्यार्थ्यांकडून अॅडमिशनच्या व्यतिरिक्त पैसे घेणे, बेकायदेशीर आणि जाचक असलेली उपस्थिती पद्धती बंद करणे, विविध उपक्रमाच्या माध्यमातून पैसे घेणे, खर्चाचा हिशेब न देणे, विनाकारण विद्यार्थ्यांना पोलिसांचा धाक दाखवून खोटे आरोप लावून विद्यार्थ्यांची पोलीस तक्रार केली.
त्यांच्या भवितव्याचा खेळ बंद करणे, महाविद्यालयातील वसतिगृह विद्यार्थींनींना प्रवेशासाठी खुले करावे, युजीसी द्वारे नेट सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून येणाऱ्या निधीचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला जात नाही तो विद्यार्थ्यांसाठी खुला करावा, सुवर्ण महोत्सव २०१४ तसेच स्नेह मेळावा २०१५ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले गेली मात्र आज पर्यंत हिशेब सादर केला गेला नाही.
महाविद्यालय सुरु असतांना सुद्धा महाविद्यालयातील खोल्या किरायाने दिल्या जातात.
त्यामुळे त्या वर्गातील तासिका होत नाही. विद्यार्थ्यांनी अनेक वेळा माहितीचा अधिकार मार्फत माहिती मागविली. परंतु उडवा उडवी उत्तरे दिली गेली.
यावर जाऊन जे विद्यार्थी अशाप्रकारची माहिती अधिकारात माहिती मागतात त्यांना प्राचार्य धमकी आणि पोलिसांचा धाक दाखवतात. लोकशाही व्यवस्थेत संवैधनिक हक्क नाकारणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही निवेदनात नमूद आहे.
महाविद्यालयाचे निलंबित प्राचार्य दडपशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्रावर घाव घालतात. नियम आणि कायद्यांना खड्ड्यात घालत आहेत.
मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात किरण, निखिल, वैभव, बंटी, शुभम, हर्षल, अमित, रोनीत, महेश, अतुल, होमेश्वर, तुषार, राम, रेशीम, स्मित यांच्यासह महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)