उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

By admin | Published: January 5, 2017 12:39 AM2017-01-05T00:39:35+5:302017-01-05T00:39:35+5:30

सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे.

Get up, wake up, get the yarn clean! | उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो!

Next

विद्यार्थ्यांनी गाजविली स्पर्धा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची वक्तृत्व स्पर्धा
भंडारा : सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होवून देशात हजारोंचा नाहक जीव जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारावी असी महाविद्यालयीन युवक युवतीनी इच्छा व्यक्त केली. अस्वच्छतेच्या अराजकतेचा विद्यार्थ्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेत परिस्थिती सुधारण्यासाठी शौचालय बांधकाम करून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ‘उठ तरुणा जागा हो, स्वच्छतेचा धागा हो’ असा मुलमंत्र देत शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यासाठी एल्गार पुकारला.
स्वच्छता जनजागृतीसाठी शासनाने कोट्यवंधीचा खर्च केला आहे. मात्र स्वच्छता अभियानाला केवळ अहवालापुरता प्रतिसाद मिळतो. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. अशा परिस्थितीवर मात देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष शौचालय बांधकामावर काम करीत आहे. त्या अनुषंगाने ही शौचालय बांधकामाची मोहिम तेवत रहावी यासाठी सदर कक्षाच्यावतीने आज जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा घेतली. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वर्क्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक आले होते. या महाविद्यालयीन युवक-युवतींनी समाजातील जुन्या प्रथा परंपरा राबविणाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. शौचालय बांधकाम करुन आरोग्य सुदृढ ठेवावे व समाजातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश द्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह गाजविला. विविध महाविद्यालयातून आलेल्या या युवांनी शौचालय बांधकाम व त्याचा वापर करा हा मुलमंत्र समाजापर्यंत पोहचविण्याची शपथ घेतली.
यावेळी युवांनी उघड््यावर शौचास जात असल्याने हवा प्रदुषणासह विविध रोगांचा आजाराने नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची यावेळी स्पर्धेतून सुर निघाले. नैसर्गिक साधन साम्रुगी असतानाही पृथ्वीचा समतोल बिघडत असून वसूधेचा नाश होत असल्याची चिंता यावेळी स्पर्धकांनी व्यक्त केली. लोकसंख्येसह कचरा प्रदुषणही वाढत आहे. माणुस शौचालयाचा शत्रु बनला असून ग्रामीण भागाचा विकास केल्यास देशाचा विकास करता येण्याची उर्मी व्यक्त केली. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. अस्वच्छतेने सर्वत्र पोखरन झालेली असून आजाराचे मुळ कारण दुषित पाणी व अस्वच्छता आहे. आजारपणामुळे दरवर्षी मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने स्वत:चे कर्तव्य समजून स्वच्छता राबवावी अशी प्रतिज्ञाच महाविद्यालयीन युवक-युवतींनी घेतली. जंगली स्वापदांचा अनेकांचा बळी गेला असून यातील अनेकजण हे शौचालयाला गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करावे असे वर्क्तृत्व स्पर्धेतून सुर उमटले. (शहर प्रतिनिधी)

विजेत्यांची नावे
जिल्ह्यातील सात तालुक्यातून कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटात २८ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रत्येक गटातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटात तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोघांची निवड करण्यात आली. कनिष्ठ गटातील प्रथम विजेता आकाश टेंभूर्णे, द्वितीय वेजेता त्रिवेणी समरीत तर तृतीय विजेते मिंजल शेख व विपूल रामटेके यांना संयुक्तीकरित्या घोषित करण्यात आले. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक नेहा हटवार या विद्यार्थीनीने पटकाविला तर द्वितीय क्रमांक मयुर बोरकर तर तृतीय क्रमांक निकिता डाखोरे व शैल शुक्ला यांना संयुक्तरित्या देण्यात आला.

Web Title: Get up, wake up, get the yarn clean!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.