‘घालीन दाणा-पाजीन पाणी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:35 AM2021-03-21T04:35:16+5:302021-03-21T04:35:16+5:30
भंडारा : ग्रीन हेरिटेज सामाजिक संस्थेतर्फे ‘घालीन दाणा-पाजीन पाणी’ उपक्रम आणि वाईल्ड वॉच फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ...
भंडारा : ग्रीन हेरिटेज सामाजिक संस्थेतर्फे ‘घालीन दाणा-पाजीन पाणी’ उपक्रम आणि वाईल्ड वॉच फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवसाचे आयोजन भंडारा येथील शीतला माता मंदिराच्या लायन्स क्लब सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून जलपात्र, बर्ड फीडर दान तर निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
अध्यक्षस्थानी गीतांजली अनिकेत भारती तर विशेष अतिथी भंडाऱ्याचे उपवनसंरक्षक एस. बी. भलावी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके, सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन झंवर, शीतला माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, पोलीस उपनिरीक्षक भूषण कोळी, वाईल्ड वॉच संस्था भंडाऱ्याचे नदिम खान, लायन्स क्लबच्या अध्यक्ष इंदिरा काबरा तसेच ग्रीन हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मो. सईद शेख मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
उपस्थितांनी चिमणी, पक्षी यांच्यासाठी सर्वाना पुढाकार घेण्याची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. काही मुलांनी चिमण्यांचे आकर्षक चित्र बनवून आणले होते. यावेळी चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याप्रसंगी निमजे, चंदा मुरकटे व बालकांची उपस्थिती होती.
अभिषेक नामदास, गीतांजली भारती, वसुंधरा फाळके, प्रतिमा सदानंद थोटे, अॅड. प्राची महांकाळ, पोलीस नायक बंटी जांगळे, अॅड. नेहा शेंडे, राजेश राऊत, अजय मते या सर्वांनी बर्ड फीडर आणि जलपात्र दान केले. लयन्स क्लबच्या काबरा दाम्पत्याकडून मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
ग्रीन हेरिटेज संस्थेच्या वतीने सर्वांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. वाईल्ड वॉच संस्थाचे अध्यक्ष नरेंद्र गुर्जर, शीतला माता मंदिर ट्रस्ट, पोलीस विभाग, वनविभाग तसेच लियाकत खान यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले..
प्रास्ताविक ग्रीन हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मो. सइद शेख यांनी केले. संचालन कविता मोरे (नागापुरे) यांनी तर आभार प्रदर्शन अनघा चेपे यांनी केले. शुभम निपाने, सिद्धेश लिमजे, स्वप्निल यादव यांनी कार्यक्रमाकरिता सहकार्य केले.