रस्त्याची वाट लावण्याचा घातला जातोय घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:32 PM2018-06-06T22:32:32+5:302018-06-06T22:32:46+5:30
तालुक्यातील खैरीपट येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम मागील चार दिवसांपासून सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून रस्त्याची वाट लावण्याचा घाट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अभियंते व कंत्राटदाराची मनमर्जी दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील खैरीपट येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम मागील चार दिवसांपासून सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून रस्त्याची वाट लावण्याचा घाट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अभियंते व कंत्राटदाराची मनमर्जी दिसून येत आहे.
सोमवारला लोकमतने या रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाचे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अभियंते व कंत्राटदाराची आणखीनच मुजोरी वाढली असून करण्यात आलेल्या डांबरीकरण बांधकामादरम्यान रस्त्यांच्या पहिल्या थराला बोल्डर वापरून त्याची चांगल्या प्रकारे दबाई न करताच मुरूम घालण्यात आले आहे. मात्र टाकण्यात आलेला मुरूमाचा थर एक ते दोन इंचीचाच असून त्यावर अल्पप्रमाणात पाणी मारल्याने लगेचच दगड उखडले आहेत. त्यामुळे रहदारीच्या नागरीकांना सलग तीन किमीचा रस्ता खडतर मार्गाने गाठावा लागत आहे.
मागील दोन महिण्यांपासून चालू असलेल्या या कामात अनेक प्रकारच्या त्रृट्या दिसून येत आहेत. बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. मात्र कंत्राटदाराने शासन नियमांना धाब्यावर ठेवत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे न ऐकता बांधकाम सुरू ठेवले आहे. हा रस्ता मागील पाच वषार्पासून उखळला असून, या मार्गाने परिसरातील चौदा गावातील नागरिक रहदारी करीत असतात.
त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होऊन, जास्तीत जास्त वर्षे टिकावा असे सर्वांनाच वाटत आहे. मात्र सुरू असलेले रस्त्याचे काम पाहता लोकांमध्ये नाराजी दिसत आहे.
या रस्त्यांच्या कामापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या सावरगाव या रस्त्यांचे काम दुसºया कंत्राटदाराला असून हे काम खुपच चांगल्या दजार्चे केले जात आहे. माहीतीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पुणे येथील चमूने या रस्त्याची पाहणी केली असता. संबंधित अभियंते व कंत्राटदाराला धारेवर धरले होते. एवढेच नाही तर रामा ३६४ ते सावरगाव या रस्त्यांच्या कामावर नेऊन अशाप्रकारे चांगल्या दर्जाचे काम करण्यास सांगितले आहे.
रस्त्यावर रचले मुरूम व गिट्टीचे ढिगार
खैरीपट येथे प्लाँटवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सदर कंत्राटदाराने रस्त्याचा मध्यभागी गिट्टी व मुरूमाची ढिगार रचली आहेत. खैरीपट ते विहीरगाव हे दोन्ही गावे १ किमी अंतरावर असल्याने विहीरगाव व खैरीपट प्लाँट येथील लोक रोज सकाळी दुध विकणे व अन्य कामाकरीता खैरीपट गावात ये-जा करीत असतात. मात्र रस्त्यांच्या मध्यभागी मुरूम, गिट्टीचे ढिगार असल्याने रहदारीच्या नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.