घोणस सापाने दिला तब्बल ५९ पिलांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:56+5:30
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप पकडायला उशिर झाल्याने रात्री जंगलात सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे या घोणस सापाला सुरक्षित पकडून निसर्गमित्र ग्रूपच्या मित्रांनी जेवनाळा येथे आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी/पालांदूर : गावात निघालेल्या घोणस सापाला पकडून एका सर्पमित्राने आपल्या घरी सुरक्षित ठेवले. दुसऱ्या दिवशी या सापाला जंगलात सोडून देण्याचा निश्चय केला. मात्र सकाळी बघतो तर काय? या घोणस सापाने एक दोन नव्हे तब्बल ५९ पिलांना जन्म दिला. पिलांसह घोणस सापाला निसर्गमुक्त करण्यात आले. ही घटना आहे लाखनी तालुक्यातील जेवनाळाची.
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप पकडायला उशिर झाल्याने रात्री जंगलात सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे या घोणस सापाला सुरक्षित पकडून निसर्गमित्र ग्रूपच्या मित्रांनी जेवनाळा येथे आणले. रात्रभर पाण्याच्या रिकाम्या ड्रममध्ये ठेवले. मात्र सकाळी या ड्रममध्ये बघितले तर या घोणस सापाने तब्बल ५९ पिलांना जन्म दिल्याचे दिसले. या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी तेथे धाव घेतली. अड्याळ येथील वन विभागाला देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून घोणस व ५९ पिलांना वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात निसर्गमुक्त केले. यासाठी आदेश गोंदोळे, दीनदयाल गिºहेपुंजे, राकेश हेमणे यांनी सहकार्य केले.
घोणस हा अतिविषारी साप असून पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. आम्ही सापाला व त्याच्या पिलांना सुरक्षित सोडले आहे. परिसरात कोणताही साप आढळल्यास सर्पमित्राला बोलावून त्यांना जीवदान द्यावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा.
-समीप हेमणे, सर्पमित्र जेवनाळा