निर्माल्य संकलनासाठी सरसावल्या विद्यार्थिनी
By admin | Published: October 5, 2016 12:42 AM2016-10-05T00:42:06+5:302016-10-05T00:42:06+5:30
येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखाच्या वतीने...
दहा वर्षांपासूनचा अविरत कार्यक्रम : ग्रीनफ्रेन्ड्स व अ.भा.अं.नि.स. चा उपक्रम
लाखनी : येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखाच्या वतीने मागील दहा वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा निर्माल्य संकलनाचा उपक्रम श्रावण, भाद्रपद महिन्यातील सणोत्सव काळात विशेषत: गणेश विसर्जनाच्या काळात राबविण्यात आला.
यावर्षीची विशेष बाब म्हणजे ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबच्या सदस्य असलेल्या राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला व याद्वारे विविध तलावावर पवित्र वस्तू म्हणून फेकला जाणारा निर्माल्य काही प्रमाणात का होईना थांबविला व तलावात होणारे जलप्रदूषण आपल्या कृतीने वाचवून पर्यावरण संरक्षणात थोडासा का होईना खारीचा वाटा या विद्यार्थिनींनी उचलला.
तत्पूर्वी निर्माल्य अर्थात हार, फुले, दुर्वा, तोरणे, पाने इतर जैविक साहित्य पवित्र वस्तू आस्थेने व पारंपारिक प्रथेने तलावात लोकांकडून टाकले जातात. त्यामुळे ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचे संघटक व अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.अशोक गायधने यांनी निर्माल्य तलावात, नदी, नाल्यात अशा पाण्याच्या ठिकाणी टाकले आल्याने तलावात हे पवित्र वस्तू कुजून त्याद्वारे पाण्यातील प्राणवायू कसा कमी होतो व हळूहळू जैवविविधतेने समृद्ध तलाव कसे निर्जीव होतात हे सोदाहरण पटवून दिले. याकरिता निर्माल्य विसर्जनाच्या वेळी नदी तलावात न टाकता त्यांचे संकलन करून निर्माल्य खत कसे करता येईल हे उदाहरणाद्वारे प्रत्यक्ष कृती करून सांगितले.
निर्माल्य संकलनाकरिता राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर यांनी विद्यार्थिनींना प्रवृत्त केले. या उपक्रमाकरिता सेवानिवृत्त कलाशिक्षक व ग्रीनफ्रेन्ड्सचे पदाधिकारी दिनकर कालेजवार, प्रा.अर्चना गायधने, अशोक वैद्य, मंगेश चांगले, सतीश पटले यांनी ग्रीनफ्रेन्ड्सच्या या सदस्य विद्यार्थिनींना सदोदीत निर्माल्य संकलनाकरिता मार्गदर्शन केले.
उपक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
(तालुका प्रतिनिधी)
२६ किलो निर्माल्य जमा
निर्माल्य संकलनाकरिता लक्ष्मी पराग अतकरी हिने पाच घरगुती गणेशोत्सवातून सहा किलो निर्माल्य संकलीत केला. खुशी प्रदीप गायधनी हिने सुद्धा दोन घरून पाच किलो निर्माल्य संकलन केला. पूजा शेखर निर्वाण सहा घरून चार किलो निर्माल्य जमा केला. श्रेया विलास रहमतकर, युक्ता प्रमोद मस्के, तनिशा लक्ष्मण सेलोकर या विद्यार्थिनीनी प्रत्येक तीन किलो निर्माल्य पाच गणेशोत्सव असलेल्या घरून जमा किलो अथर्व अशोक गायधने याने दोन किलो निर्माल्य जमा केला.