मुलींनी ध्येय ठरवून स्वत:ला सक्षम बनवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:37 PM2017-09-15T22:37:08+5:302017-09-15T22:37:28+5:30
मुलींनी स्वत:चे ध्येय ठरवा ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करून आत्मनिर्भर व्हा, सक्षम बना, धैर्यवान व्हा,....
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मुलींनी स्वत:चे ध्येय ठरवा ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करून आत्मनिर्भर व्हा, सक्षम बना, धैर्यवान व्हा, अन्यायाचा प्रतिकार करायला शिका, पोलिसांची भीती बाळगू नका, अन्याय, अत्याचार झाल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा, अन्याय करणाºयापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
भंडारा पोलीस दल व राज्य महिला आयोग यांचे वतीने शालेय विद्यार्थीनीचे लैगीक अत्याचार प्रतिबंध व संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बुधवारी करण्यात आले. या शिबिरात उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर राज्य महिला आयोग सदस्या अंकिता ठाकरे, साकोली पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिमले, एम.बी. पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेश त्रिवेदी, महिला आयोगाच्या जिल्हा समुपदेशक मृणाल मुनीश्वर, समन्वयक वैशाली केळकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. बांते उपस्थित होते. १३ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर अशा पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढे बोलताना पोलीस अधिक्षिका विनिता साहू पुढे म्हणाल्या फेसबुक, सोशल मिडिया या आधुनिक तंत्रज्ञानातून फसवणूक होऊ शकतो. या तंत्राचा सुरक्षित वापर करून धोके ओळखा. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभाग तसेच महिला आयोगातर्फे स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करून किशोरवयीन मुलींना निर्भर बनवण्यसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. मुलींनी यांचा उपयोग करून सक्षम बनायचे आहे.
राज्य आयोग सदस्य नीता ठाकरे यांनी, जिल्ह्यातील साकोली, पवनी, भंडारा या तालुक्यात मुली पळून जाणे व पळवून नेणे याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक बदलामुळे मुलांप्रती आकर्षण निर्माण होते. त्यातून मुलींकडून चुका घडतात. मुलींना भविष्यातील धोक सांगणे हा शिबिराचा उद्देश आहे. प्रास्ताविकातून जिल्हा समुपदेशिका मृणाल मुनीश्वर यांनी, आजची किशोरी उद्याची माता आहे. तिला सक्षम करणे यासाठी महिला आयोगाकडून प्रयत्न केले जाते आहे. साकोली पोलीस उपविभागीय अधीक्षक श्रीकांत डिसले यांनी करियर विषयक मार्गदर्शन केले. संचालन मनिषा काशिवार यांनी केले. आभार वैशाली केळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सविता सोनकुसरे, स्रेहल रामटेके, सुधीर वर्मा, अनुराधा फुकट आदींनी सहकार्य केले.