मुलींनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:14 PM2018-03-25T23:14:33+5:302018-03-25T23:14:33+5:30
प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे.
आॅनलाईन लोकमत
पवनी : प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. उणीव भरुन काढण्यासाठी मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे प्रतिपादन तालुका संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले.
शिक्षण विभाग पंचायत समिती पवनी तर्फे नगर परिषद विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियानात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. शिक्षणासोबतच मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला पाहिजे कारण स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार वाढत आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी महिलांनी केली पाहिजे असे मत जिभकाटे यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, मुख्याध्यापक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष अशोक पारधी, योग शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा बागडे, न. प. चे जेष्ठ शिक्षक जगदीश देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
देशात स्त्रीभ्रूण हत्या वाढत असल्याने नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी शासनाने ' लेक वाचवा, लेक शिकवा' अभियान सुरू केले. मुलगा असो वा मुलगी दोन्ही सारखेच ही भावना जनमानसात रुजू लागली आहे. मुलींनी खुप शिकायला पाहिजे असे वाटत असेल तर पुरुषांना मानसिकता बदलायल हवी असे विचार मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी व्यक्त केले.
पुष्पा बागडे यांनी सुदृढ राहण्यासाठी योग - प्राणायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.उद्घाटन प्रसंगी संगीत शिक्षक शशांक आठल्ये आणि चमूने हमे इतनी शक्ती देना दाता हे समुह गीत सादर केले.
वैनगंगा विद्यालय, विकास विद्यालय, नगर परिषद विद्यालय व गांधी विद्यालय कोंढा येथील विद्याथ्यीर्नींनी पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांनी केले. संचालन सहा. शिक्षिका संगीता उताणे यांनी तर आभार साधन व्यक्ती दिपाली बोरीकर यांनी मानले.