२४ तास थ्री फेस वीज द्या
By admin | Published: January 3, 2016 01:08 AM2016-01-03T01:08:35+5:302016-01-03T01:08:35+5:30
परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे ....
शेतकऱ्यांची मागणी : सहायक अभियंता पंकज आखाडे यांना निवेदन
पालांदूर : परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे पण नियमित वीज मिळत नसल्याने पीक घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने २४ तास थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबबात सहायक अभियंता पंकज आखाडे यांना शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. सध्या मागणी नसल्यामुळे २४ तास थ्री फेज वीज अनपेक्षितपणे मिळत आहे. ज्यादिवशी ऊन वाढून पिकाला पाण्याची गरज पडेल तेव्हा महावितरण केवळ ८ ते १० तासच वीज पुरविते. यामुळे पिकाला पाणी मिळायला अडचण निर्माण होते. पाणी आहे, पण वीज नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते.
त्यामुळे महावितरण ने नियमितता दाखवत आजच्या धर्तीवर पुढेही २४ तास वीज द्यावी अशा मागणीचे निवेदन घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे, पाथरीचे उपसरपंच जितेंद्र उटाणे यांनी निवेदनातून आपल्या व्यथा अभियंता आखाडे यांच्या समोर मांडल्या.
सध्या मिळत असलेल्या वीजेच्या भरोशावर धानपीक वाढविले आणि पुढे जर वीज कमी केली तर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे उद्याचे नुकसान होऊ नये याकरिता महावितरण कंपनीने विचार करता वीज उत्पादन बऱ्यापैकी असल्याने आणि शहरातील काही उद्योग बंद पडल्याने वीज वापर कमी होत असल्याचे बोलले जाते. बंद उद्योगधंद्याची वीज ग्रामीण भागात पुरवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पालांदूर महावितरण कंपनी वीज चोरीचे व तुटीचे प्रमाण कमी होऊन शून्य पोलवर वीज देण्याचा सपाटा यामुळे वीज ग्राहकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नियमित २४ तास विजेची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतीपंपाच्या मीटरचे रिडींग न घेता वारेमाप वीज बील दिल्या जाते. महावितरणने पारदर्शकता आणून जळालेला विीेचेच बिल शेतकऱ्यांना देण्याची मागणीसुध्दा करण्यात आली आहे.
२०० फुटापर्यंत केबलवर वीज कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे कनेक्शन देण्यास अंतराचे कारण पुढे करीत नाकारले जात आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित जिल्हा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारुन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)