फळबाग बोडीला ५० कोटींचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:52 PM2018-01-06T23:52:04+5:302018-01-06T23:52:23+5:30
आॅनलाईन लोकमत
तुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनातून केली आहे.
विदर्भातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळावा, याकरिता शासनाने मदत करावी. शेतमाल (धान्य व फळभाजी) यांना उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा मिळवून समर्थन मूल्य जाहिर करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल शासनाने जाहिर केलेल्या समर्थन मूल्यापेक्षा कमी किंमतीत विकु नये याची जबाबदारी शासनाने घ्यावी, शेतकऱ्यांना शेतमाल नुकसानीत विक्री करण्याचे संकट येऊ नये, याची जबाबदारी शासनाने घ्यावी, तहसीलदारावर नियंत्रणाची जबाबदारी सोपवावी. शेतमाल धान्य व भाजीपाला यांचा उत्पादन खर्च व ५० टक्के नफा मिळवून खरेदीची व्यवस्था सरकारने करावी आदी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग केंद्राचे कार्यालय असून या केंद्राद्वारे शेतकºयांशी पत्रव्यवहार हा इंग्रजीत सुरु आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कार्यालयाचा पत्ता माहित नाही. कार्यालयाशी पत्रव्यवहार हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करावा व पत्रव्यवहाराची भाषा किमान हिंदी असावी अशी मागणीही शिशुपाल पटले यांनी केली.