अन्यायग्रस्तांना आर्थिक मदत द्या

By admin | Published: January 4, 2017 12:46 AM2017-01-04T00:46:49+5:302017-01-04T00:46:49+5:30

राष्ट्रीय महामार्गासह भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

Give financial help to the injustices | अन्यायग्रस्तांना आर्थिक मदत द्या

अन्यायग्रस्तांना आर्थिक मदत द्या

Next

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : प्रकरण शहरातील अतिक्रमण काढल्याचे
भंडारा : राष्ट्रीय महामार्गासह भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढलेल्या प्रत्येक कुटुंबास १० हजार रुपये महिना शासनाने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
भंडारा नगरपालिका हद्दीत व्यवसायाच्या दृष्टीने अनेक बेरोजगार युवक तथा नागरिकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी रस्त्यालगतच्या जागांवर व्यवसाय थाटले. अशा व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब सुरळीत सुरु आहे. दिवसागणिक अशा व्यवसायीकांची मोठी संख्या भंडारा शहरात दिसू लागली.
शहरातील बाजारपेठेसह अन्य मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर व्यवसाय थाटणाऱ्या नागरिकांवर जिल्हा व पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी संसाराचा गाढा या व्यवसायाच्या माध्यमातून सुरु ठेवलेला असताना प्रशासनाने त्यांच्यावर केलेली ही कारवाई त्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे. शासनाने अतिक्रमणधारकांना हॉकर्स झोन तयार करून द्यावे व फुटपाथवर व्यवसाय थाटणाऱ्यांना नियमित व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आता लावून धरली आहे.
अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांवर या कारवाईमुळे उपासमारीचे संकट ओढावले असून सर्वांच्या कुटुंबियांना शासनाने किमान १० हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे.
शिष्टमंडळात माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, नरेंद्र झंझाड, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, भगवान बावनकर, नितीन तुमाने, महेंद्र गडकरी, जयंत वैरागडे, डॉ.जगदिश निंबार्ते, नरेंद्र बुरडे, डॉ.रविंद्र वानखेडे, मीना कुरंजेकर, जुमाला बोरकर, संजू सतदेवे, बबलू खान, किरण कुंभरे, अमर उजवणे, इकबाल खान, असद हुसैन, महेंद्र बारापात्रे, गजानन बादशहा, मौसम ठाकूर, बंटी वैद्य, क्रिष्णा उपरीकर, अक्षय रामटेके, अरुण अंबादे, मोनू गोस्वामी, स्वप्नील नशिने, अरविंद पडोळे, आहुजा डोंगरे, प्रदीप सुखदेवे, गणेश बानेवार, सोनू खोब्रागडे, मकसूद पटेल, राजपूत, गुड्डू भाई, रवी लक्षणे, क्रिष्णा गुणेवार, सोहेल अहमत. इ. कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give financial help to the injustices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.