बेरोजगारांना रोजगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:21 PM2018-03-13T23:21:05+5:302018-03-13T23:21:05+5:30
राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
सन १९८३ मध्ये गडेगाव (एमाआयडीसी) निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात राजेगाव परिसरातील जमीन हस्तांतरीत करण्यात आली होती. त्याअंतर्गत मोबदल्यात स्थानिकांना मोबदला स्वरूपात त्यांच्या कुटूंबातील सदस्याला कारखाण्यात नोकरी देण्याच्या अटीवर स्थानिकांची शेतजमीन देण्यात आली.
परंतु आजतागायत राजेगाव येथील स्थानिकांना कारखाण्यामध्ये घेण्यात आले नाही. या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांनी जमीनी गेलेल्या सर्व जमीनधारकांना नोकरी मिळण्या संदर्भात पत्रव्यवहार करून पाठविण्यात आले होते.
परंतु, त्याची दखल कंपनी प्रशासनाने घेतली नाही. अशोक लेलँड कारखाणा यासह अन्य अशा ४० कारखाणे राजेगाव हद्दीत आहेत. मात्र स्थानिकांना रोजगार वा नोकरी मिळू शकली नाही. उलट नुकसान होऊन बेरोजगारी व उपासमारीची वेळ सर्व राजेगाववासीयांवर आली आहे.
अशोक लेलँड कारखाण्यामध्ये नोकरीवर समाविष्ठ करण्यात यावे, अशी मागणी अन्यथा बहुजन समाज पक्षाच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, शिलवंत रंगारी, कुंजन शेंडे, पायल गाणार, कैलास झंझाड, राजेगावच्या सरपंचा अनिता शेंडे, संजीव शेंडे, राजू शेंडे, प्रमोद वासनिक, कपील घोलपे यांचेसह अन्य बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.