स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:13+5:302021-02-15T04:31:13+5:30
चुल्हाड (सिहोरा) : वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे, वाहन चालकाकडून नियम पाळल्या जात नाही, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे ...
चुल्हाड (सिहोरा) : वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे, वाहन चालकाकडून नियम पाळल्या जात नाही, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे आणि त्यातून उद्भवणारे किरकोळ अपघात, यामुळे वाहनचालकांनी काटेकोरपणे सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या, असे प्रतिपादन ग्रामविकास हायस्कूल हरदोली येथे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी केले. ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने हरदोली (सी) येथील ग्रामविकास हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर सिहोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या एस.बी. पटेल, प्रमुख उपस्थितीत शिक्षक एस.बी. डहाळे, वाहतूक पोलीस उमेश सेलोकर, के.एस. पटले, पर्यवेक्षक जी.एम. ठाकरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिहोरा पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी विविध उपक्रमांतर्गत जनजागृतीवर भर, वाहन चालकांना मोटारवाहन कायद्याची माहिती, अवैध प्रवासी व जड वाहतूक यांच्यावर कारवाई करणे, विशेष करून मोबाइलचा दुरपयोग, यामुळे ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लैंगिक अत्याचाराला बळी पडणे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मोटारवाहन अपघातास परिणामकरकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन विद्यालय आणि सिहोरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होता. संचालन टी.आर. वाहने यांनी केलेे, ेतर उपस्थितांचे आभार एस.आर. उके यांनी मानले आहे.