‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:47 PM2018-02-24T22:47:29+5:302018-02-24T22:47:29+5:30

धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ...

Give that punishment to the accused | ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा द्या

‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संताजी युवा सेनेची मागणी

आॅनलाईन लोकमत
भंडारा : धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संताजी युवा सेना भंडारा शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या घटनेचा संताजी युवा सेना तर्फे निषेध करण्यात आला.
याबाबत असे की, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात नूतन माध्यमिक विद्यालयात ५ वर्षाच्या बालिकेवर अमानुष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या आईवडीलांनी दोषी विरुद्ध गुन्हा दाखल केला व जळगाव सिव्हील हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणी व उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे. तेली समाजाच्या बालिकेवर झालेला हा अन्याय संपूर्ण भारतातील तेली समाजाने खपवून घ्यायचा का? असा सवाल करुन फाशीची शिक्षा जर आरोपीस झाली नाही तर, तेली समाजबांधवांतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व समाजात अशाप्रकारची पुनर्घटना घडू नये, याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.
शिष्टमंडळात मंगेश वंजारी, अमित बिसने, शिशीर बावनकुळे, योगेश पडोळे, प्रशांत गभणे, अमित मेहर, आदित्य मोटघरे, रोशन केसलकर, आकाश बावनकुळे, कमल साठवणे, तसेच महाराष्ट्र प्रांतीक तेली संघटनेचे देवीदास लांजेवार, जाधवराव साठवणे, कुंदा वैद्य, शोभा बावनकर, प्रमिला डोरले, छाया गभणे, अपूर्वा नवखरे, अखिल भारतीय तैलीक साहू महासभाचे सुभाष घाटे, दिनेश मस्के, राकेश ईखार, श्रावण नागुलवार आदींचा समावेश होता.

Web Title: Give that punishment to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.