जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दिलासा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:42 PM2017-09-16T22:42:15+5:302017-09-16T22:42:38+5:30

भंडारा जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी ४५ टक्के ते ५० टक्के रोवणी झाली आहे.

Give relief to the district by declaring it as drought-affected | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दिलासा द्यावा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दिलासा द्यावा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकारी दिवसे यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी ४५ टक्के ते ५० टक्के रोवणी झाली आहे. सततच्या नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सावकार व बँकेचा कर्जबाजारी झाला आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येत दुपटीने वाढ झाली आहे. शेतकºयांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे,धनंजय दलाल, नरेंद्र झंझाड, अनिल जैन, सुमेध श्यामकुंवर, ज्योती खवास, अरुण गोंडाणे, डॉ. रविंद्र वानखेडे, उत्तम कळपाते, रूपेश खवास, सविता नागदेवे, ज्योती टेंभुर्णे, निरू पेंदाम, रामरतन वैरागडे, ईश्वर कळंबे, बंडू शेंडे, राजेश मेश्राम, वामन शेंडे, शिवदास चोपकर, रविदास वैरागडे, गोलेनाथ वैरागडे, संजय बोदरे, प्रभू फेंडर, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Give relief to the district by declaring it as drought-affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.