शास्त्री चौकातील दुकाने फूटपाथधारकांना कमी किमतीत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:28+5:302021-06-21T04:23:28+5:30
जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, भंडारा शहरात इंग्रजांच्या काळापासून लालबहादूर शास्त्री या शाळेची इमारत आहे. जिल्ह्यातील ही ...
जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, भंडारा शहरात इंग्रजांच्या काळापासून लालबहादूर शास्त्री या शाळेची इमारत आहे. जिल्ह्यातील ही नावाजलेली शाळा आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या कोरोना काळात या शाळेत अनेक रुग्णांना औषधोपचारासाठी ठेवण्यात आले होते. ही जागा सर्वदृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. फूटपाथधारक दुकानदार हे गरीब असल्याने ते या दुकानांसाठी मोठी रक्कम देऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दुकाने लावणारे फूटपाथधारक उघड्यावर पडणार आहेत. तेव्हा या दुकानांचे गाळे फूटपाथधारकांना कमीत कमी किमतीत देण्यात यावेत अन्यथा या ठिकाणी दुकानाचे गाळे काढू नयेत. कारण सर्व फूटपाथधारक रस्त्यावर येतील. फूटपाथधारकांना न्याय मिळावा यासाठी फूटपाथ शिवसेना संघटना, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती यांच्यावतीने भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
फूटपाथधारकांची ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.