शिक्षक संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

By admin | Published: May 26, 2016 01:40 AM2016-05-26T01:40:59+5:302016-05-26T01:40:59+5:30

शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हयात कोणत्याही विद्यालयाच्या अनुदानित तुकडीवरील (संख्येनुसार) शिक्षक अतिरिक्त होणार नाही

Give students access to teachers according to the number | शिक्षक संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

शिक्षक संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

Next

निर्देशाची गरज : दाखल्यासाठी तारीख पे तारीख
सानगडी : शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हयात कोणत्याही विद्यालयाच्या अनुदानित तुकडीवरील (संख्येनुसार) शिक्षक अतिरिक्त होणार नाही या दृष्टीने मंजुर शिक्षकाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सत्र २०१६-१७ मध्ये प्रवेश देतांना मंजूर शिक्षक क्षमतेच्या अधिन राहून प्रचलित आरक्षणाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. परवानगी न घेता ज्यादा प्रवेश दिल्यास दुसऱ्या शाळेतील मंजुर अनुदानित शिक्षकांवर परिणाम होणार नाही अशी खात्री करावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना करावी. पालकांना माध्यमिक तथा उच्च माध्यमिक मान्यता वर्ग व प्रवेश क्षमता कळावी, त्याकरिता दर्शनी भागावर वेळापत्रक लावण्यात यावे.
जिल्हा परिषद व खाजगी शाळांचा सुळसुळाट झाल्याने शाळेचे अस्तीत्व टिकवून ठेवण्यासाठी उन्हातही शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे शासनाच्या नविन धोरणानुसार पहिली ते पाचवी प्राथमिक शाळा, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शाळा, नववी ने दहावी माध्यमिक व अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक असा शैक्षणिकस्तर आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांना पाचवीचे व आठवीचे वर्ग जोडण्याचे फर्मान शासनाने काढले. त्यानुसार काही शाळेत वर्ग जोडण्याची कार्यवाही सुरु आहे. शासनाने ज्या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग सुरु आहेत अशा शाळेतील शिक्षकांचा काय होईल याचा विचार केला नाही. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करणे आवश्यक आहे. शाळा टिकविण्यासाठी शिक्षक हवेतच विरणारी आश्वासने देत आहेत. लोकप्रतिनिधी, समाजसेवकांना हाताशी धरुन दुसऱ्या शाळेपेद्या माझी शाळा कशी चांगली आहे असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही शाळेतील मुख्याध्यापक नोकरी लावून देण्याचे आमिष देत आहेत. शाळेशाळेत वैर निर्माण झाले आहे.
शाळा सोडण्याचा दाखल्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक हितसंबंध असलेल्या शिक्षकांना निश्चित तारीख देतात व हितसंबंध नसलेल्या शाळेतील शिक्षकांना तारीख पे तारीख देतात. एवढा आटापिटा कशासाठी? फक्त विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी गुणात्मक विकास वाढविण्यासाठी नाही. उन्हाच्या तडारण्याने जिवाची लाही लाही होत आहे. जीवनशैलीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हापरिषद तसेच खासगी शाळेतील मुख्याध्यापकांनी चिंतन करुन मंजूर शिक्षक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना मान घुडीस मिळणार यात तिळमात्र शंका नाही. शिक्षणाधिकारी यांनी सुध्दा विद्यार्थी प्रवेशाबाबत कठोर पावले उचलावी, अशी शिक्षक वतुर्ळात चर्चा आहे. (वार्ताहर)

Web Title: Give students access to teachers according to the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.