उन्हाळी धान खरेदी सात-बारा ऑनलाईनसाठी मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:58 AM2021-05-05T04:58:10+5:302021-05-05T04:58:10+5:30
काेराेना संकटामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील तलाठी सजे बंद हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला सात-बारा ऑनलाईन करणे शक्य झाले नाही. बेला ...
काेराेना संकटामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील तलाठी सजे बंद हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला सात-बारा ऑनलाईन करणे शक्य झाले नाही. बेला येथील तलाठी पाॅझिटिव्ह असल्यामुळे कार्यालय बंद हाेते. तात्पुरता प्रभार भाेजापूरच्या तलाठ्यांकडे देण्यात आला; परंतु सात-बारामध्ये नाेंद घेण्याचे अधिकार त्यांना दिले नाही. याबाबत तहसीलदारांशी चर्चा करून काही शेतकऱ्यांचे सात-बारा अपडेट केले; परंतु बेला येथील धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी सात-बारा ऑनलाईन करू शकले नाहीत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणची आहे. सात-बारा ऑनलाईन करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत हाेती. आता काेराेनामुळे संचारबंदी आहे. घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील ५० टक्क्यांच्यावर सात-बारा ऑनलाईन झाले नाहीत. अशा परिस्थितीत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.