‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:08 AM2019-07-28T01:08:02+5:302019-07-28T01:08:28+5:30

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Give those 'accused' severe punishment | ‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । प्रकरण उत्तर प्रदेशातील सोनभद्रचे, आदिवासी संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनांनुसार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादावरून आदिवासी बांधवांवर गोळीबार करण्यात आला. यात दहा आदिवासींना जीव गमवावा लागला. तर २८ जण जखमी झालेले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. घडलेले हत्याकांड लोकशाही प्रदान देशात लाजीरवाणी बाब आहे. कोणत्याह जटील प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता विविध न्यायालयाचा अवलंब करण्यात येतो. परंतु देशामध्ये नीती मार्गाचा अवलंब न करता अनितीने आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न काही व्यभीचारी लोक करीत आहेत. अशा गुंडांना काही वरिष्ठ मंडळी पाठीशी घालून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य व केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सचिव डॉ.प्रमोद वरकडे तर नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स स्टूडंटस् फेडरेशनचे लाखनी तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे, शंकर उईके, कैलाश परतेकी, अमीत धंडारे, अमरसिंग उईके, शिवशंकर धुर्वे, धीरज उईके, प्रशांत सलामे, राजू सलामे, राकेश उईके, रवी धुर्वे, देवानंद धुर्वे, तेजराम कोकोडे, योगराज जुगनायके यांचा समावेश आहे.

जलदगती न्यायालयात सुनावणी करा
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ज्या आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवायचा आहे त्यांच्यावर आक्रमण करून त्यांची हत्या करण्यासाठी बाहेरगावावरून ३२ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गुंडांना आणण्यात आले. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घालून तेथील आदिवासींवर अंधाधुंद गोळीबार केला. आदिवासींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही आरोपींना कठोर शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सोनभद्र येथील आरोपींवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून अविलंब त्यांना फाशीवर चढविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: Give those 'accused' severe punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.