दोन हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:32+5:30
भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाकडून योजनांचा लाभ मिळतोय म्हणून केवळ बांधकाम कामगारांची नोंदणी अवैधरित्या करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. याला भंडारा पंचायत समितीकडून त्याला खतपाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील अनेक कामगार पंचायत समितीमध्ये कामगार नोंदणी करण्यासाठी येत असून दोन हजार रूपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा, असा छुपा फतवाच काढण्यात आला आहे.
यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. भंडारा कामगार आयुक्तालयांतर्गत ३९०० बांधकाम कामगारांसाठी पावती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंतु भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे.
एजंटांकडून पैसे मोजलेल्यांचीच नोंदणी होत असल्याने खºया गरजू कामगारांना याचा लाभ मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. मात्र यासाठी अधिकाºयांना वारंवार भेटून देखील अधिकारी कर्मचारी या एजंटांना खतपाणी घालत आहेत.
कामगारांकडून नोंदणीकृत करण्यासाठी ८५ रुपये घेण्याचा शासनाचा नियम असताना भंडारा पंचायत समितीत नोंदणी करण्यासाठी कर्मचारी कामगारांकडून २०० रुपयाप्रमाणे वसुली करीत आहेत. कामगार नोंदणीसाठी कर्मचाºयांकडून गावागावात दलाल तयार झाले असल्याने हे एजंट नोंदणी करण्याचे आमीष देऊन कामगारांकडून दोन हजार रुपयांची लुबाडणूक करीत आहेत. तसेच दररोज येणाºया ग्रामीण भागातील कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते. दिवसभरात फक्त ५० कामगारांची नोंदणी होत असल्याने हे एजंट बाहेर पैसे दिल्यावरच फावल्या वेळेत पावत्या फाडत आहेत. याविरोधात कामगारांनी एकत्र येत कामगार उपायुक्तालयाला घेराव घातला असता त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक दिली.
अन् अधिकारी,कर्मचाऱ्यांनी काढला पळ
यावेळी घडलेल्या या प्रकाराने पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखत पळ काढला. रात्रीपर्यंत कामगार पंचायत समितीत तळ ठोकून होते. मात्र त्यांच्याकडे एकही अधिकारी कर्मचारी फिरकला नाही. यावेळी कामगारांसोबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बेला येथील सरपंच पूजा ठवकर, मंगेश हुमणे, बालू ठवकर, आभा चोले, युवा संग्राम शहर अध्यक्ष कमल साठवणे, दिगांबर गाढवे, महेंद्र रामटेके, अनिल कढव, जाखचे सरपंच विनोद जगनाडे, रवींद्र वंजारी, स्वप्नील आरीकर, संजय सार्वे, शिल्पा सोनारकर, संगीता बाभरे, वर्षा माकडे आदी मान्यवर कामगारांसोबत उपस्थित होते.