विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:32 PM2019-01-07T21:32:34+5:302019-01-07T21:32:57+5:30

विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल भाजप व काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतली नाही. आश्वासन देवूनही विदर्भ राज्य निर्मिती होवू शकली नाही. मात्र आम्ही हिमंत हरलो नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या,अन्यथा विदभार्तून चालते व्हा!, 'विदर्भ राज्य देता की जाता' असा सवाल भाजपा सरकारला गांधी चौक पवनी विदर्भ राज्य आंदोलन समिति चे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले.

Give Vidarbha, otherwise run from Vidarbha! | विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा!

विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा!

Next
ठळक मुद्देराम नेवले : पवनी, विरली, लाखांदुरात विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी/लाखांदूर/ विरली : विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल भाजप व काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतली नाही. आश्वासन देवूनही विदर्भ राज्य निर्मिती होवू शकली नाही. मात्र आम्ही हिमंत हरलो नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या,अन्यथा विदभार्तून चालते व्हा!, 'विदर्भ राज्य देता की जाता' असा सवाल भाजपा सरकारला गांधी चौक पवनी विदर्भ राज्य आंदोलन समिति चे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले.
विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे पवनी, विरली व लाखांदूर येथे रविवारी आगमन होताच विदर्भवादी नेत्यांनी स्वागत केले. यावेळी राम नेवले म्हणाले, सन २०१४ मध्ये भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालावर उत्पादन खर्च, ५० टक्के एवढे हमी भाव, वीज भानियमन, विजेचे दर कमी करणे आदी सर्व आश्वासने दिले होते. मात्र सर्व आश्वासन हवेत विरली. या प्रश्नांचे एकच उत्तर स्वतंत्र विदर्भ राज्य असून विदर्भ राज्य आंदोलनात सामील व्हा, असे जनतेला आवाहन केले. आंदोलन समिती भाजप सरकारला इशारा देते की तुम्ही कबूल केल्याप्रमाणे २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य झाले नाही तर विदर्भातील जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठविल्या शिवाय राहणार नाही.
पवनी येथे नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार, नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्षा विजय धोटे, भंडारा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, अच्युत कोसे, मुकेश मासुरकर, हिरालाल खोब्रागडे, प्रकाश पचारे, डॉ विक्रम राखडे, जी. डी. मेश्राम, डॉ सुनील जीवनतारे, गुलाब राठोड, गुलाबराव धांडे, पौर्णिमा भिलावे, गजानन तालेकर, विजय मोंदेकर, सौरभ गभने, रंगराव हजारे, भगवान झंझाड, जाधवराव साठवणे, यशवंत बीरे, अनिल भुरे, दयाराम सावरबांधे, धनपाल सावरबांधे, गणेश भोपे, वैद्य गुरुजी,पुंडलिक काटेखाये, गणेश सावरबांधे, नागोराव शिंदे, विनायकराव कोरे, अशोक नागरिकर, रविंद्र सावरबांधे, श्रीराम मरघडे, नरेश बागडे आदी उपस्थित होते.
लाखांदूर येथे सौरभ गभने, जाधव साठवणे, यशवंत बीरे, भगवान झंझाड, मोरेश्वर बोरकर, शिलमंजू सिंहगड,े मनोज बन्सोड, विश्वपाल हजारे, टीकाराम मडावी, मंगला बगमारे, भुमेश्वर महावाडे, गजानन ठाकरे, हरीचंद्र कोरे, चेतन भेदरकर, वनिता पत्रे, चंद्र शेखर खेडीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Give Vidarbha, otherwise run from Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.