मोराला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:24 AM2021-06-22T04:24:14+5:302021-06-22T04:24:14+5:30
भंडारा : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून त्याच्या अस्तित्वाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. शहापूरलगत नांदोरा येथे गावालगत ...
भंडारा : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून त्याच्या अस्तित्वाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. शहापूरलगत नांदोरा येथे गावालगत मोर पाण्याच्या शोधात आले आहेत. हे मोर गावातील कुत्र्यांना दिसताच त्यांनी त्या मोराचा पाठलाग करून गंभीर जखमी केले. हे दृश्य त्या भागातून जात असलेल्या दीपक घोडेस्वार यांना दिसले. त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मोराची सुटका केली. त्या मोराला आपल्या घरी आणून सुरक्षित ठेवले. त्यानंतर लगेच त्यांनी पक्षीमित्र प्रवीण भोंदे व संजय कळंबे यांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच ते त्या ठिकाणी पोहोचले व दीपक घोडेस्वार यांनी त्या मोराला त्यांच्या स्वाधीन केले. लगेच ते पक्षीमित्र त्या मोराला उपचारासाठी शहापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. उपचाराअभावी या मोराचे बरे वाईट होऊ नये म्हणून प्रसंगावधान लक्षात घेऊन वनविभागाच्या पथकाशी संपर्क साधून वनक्षेत्र सहाय्यक दुर्गाप्रसाद मेहर व वाहन चालक जाणीराम पाथोडे यांच्याकडे त्या जखमी मोराला सुपुर्द केले. त्यांनी या जखमी मोराला उपचारासाठी पशुवैद्यकीय जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेले. यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान देण्यात आले.