ग्लोबल नेचर क्लबचे विविध पर्यावरण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:19 PM2017-10-14T23:19:08+5:302017-10-14T23:19:22+5:30
येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत विविध पर्यावरण उपक्रम राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत विविध पर्यावरण उपक्रम राबविण्यात आले. जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे तसेच बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई नागपूर टायगर सेलच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त जैवविविधता मार्गदर्शन करण्यात आले.
बी.एन.एच.एस.चे प्रकल्प शिक्षणाधिकारी यांनी जैवविविधता मार्गदर्शनात नागझिरा, नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे स्थानिक परिसराला कसे महत्व आहे हे समजावून दिले. यावेळी लागोपाठ दोन दिवस त्यांनी वाघ वाचवा या शिर्षकांतर्गत स्लाईड शो कार्यक्रम तसेच दुसºया दिवशी वाघोबाची सर या फिल्म शो चे आयोजन विद्यालयात करण्यात आले. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वने वाचवा, नद्या वाचवा याबद्दल अलप्रतिज्ञा कटकवार विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना ग्लोबर नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी दिली.
यानिमित्ताने कटकवार विद्यालय व राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे स्वच्छतेचे महत्व सांगणारी जनजागृती रॅली साकोली शहरात महामार्गावर काढण्यात आली.
वरील सर्व उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता संस्थासचिव विद्या कटकवार, प्राचार्य विजय देवगिरकर, ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने, पुष्पा बोरकर, बी.एन. मांदाडे, प्रा.संजय पारधी, प्रा.के.पी. बिसेन, शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, एस.एस. लांजेवार, बाळकृष्ण लंजे तसेच इतर शिक्षक महोदयांनी अथक परिश्रम घेतले.