सेंदुरवाफा-साकोलीचा विकास हेच ध्येय

By admin | Published: January 15, 2017 12:29 AM2017-01-15T00:29:16+5:302017-01-15T00:29:16+5:30

सेंदुरवाफा साकोलीवासीयांच्या स्वप्नाची पुर्तता करण्याचे माझे ध्येय असून त्याकरीता आपल्या सर्वांची साथ हवी आहे.

The goal of Senthurwaafa-Sakoli is the development | सेंदुरवाफा-साकोलीचा विकास हेच ध्येय

सेंदुरवाफा-साकोलीचा विकास हेच ध्येय

Next

नाना पटोले : साकोलीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
साकोली : सेंदुरवाफा साकोलीवासीयांच्या स्वप्नाची पुर्तता करण्याचे माझे ध्येय असून त्याकरीता आपल्या सर्वांची साथ हवी आहे. या दोन्ही गावांच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी नगरसेवक व नगराध्यक्षांनी प्रमाणिकपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
साकोली येथे भाजपतर्फे आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, रवि अग्रवाल, सभापती धनपाल उंदीरवाडे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा महामंत्री भरत खंडाईत, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, दीपक मेंढे, अ‍ॅड.दिलीप कातोरे, माजी सभापती गीता कापगते, नईम अली, इंद्रायणी कापगते, सविता ब्राम्हणकर उपस्थित होते.
यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, निवडणुकीत निवडून येणे सोपे आहे. मात्र पाच वर्षे जनतेत टिकून राहणे कठीण आहे. कारण लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचा आढावा हा पुढच्या निवडणुकीत पाहुनच मतदान केले जाते. यापुर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यांनी लोकांची कामे केली नाही त्यामुळे मतदारांनी त्यांना नाकारून भाजपला सत्तेवर आणले. त्यामुळे आपल्याला कामे करावी लागणार आहेत. याची खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे.
यावेळी साकोलीच्या नवनियुक्त नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेवक अनिता पोगडे, जगन उईके, राजश्री मुंगुलमारे, लता कापगते, रोहिनी मुंगूलमारे, शैजुताई बोरकर, पुरूषोत्तम कोटांगले, नालंदा टेंभुर्णे, तरूण मल्लाणी, मिना लांजेवार, वनिता डोये, रवि परशुरामकर, सुभाष बागडे, गीता बडोले या नगरसेवकांचा शाल श्रीफळ व पुुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

१६ तास वीज पुरवठा देऊ -काशीवार
भारनियमन हे मागील सरकारचे पाप आहे. यावर काही तरी तोडगा काढू. यावर्षीच्या उन्हाळी पिकाकरीता १६ तास विद्युत पुरवठा करू यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे आमदार बाळा काशीवार यांनी सांगितले.
स्वामीजी पडद्यामागचे हिरो
भाजप मेळावा व सत्कार समारंभप्रसंगी खासदार नाना पटोले यांनी साकोली नगर परिषदेच्या भरीव यशाबद्दल स्वामीजी यांची स्तुती करीत स्वामीजी म्हणजे पडद्यामागचे हिरो अशी प्रशंसा केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात एकोडीचे सरपंच अनिरूद्ध समरीत, चांदोरीचे सरपंच नंदू हातझाडे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपात प्रवेश केला.

Web Title: The goal of Senthurwaafa-Sakoli is the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.