ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक कोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:46+5:302021-07-31T04:35:46+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, गावात आलेल्या पथकास स्थानिक ...

Good Morning Squad in rural areas in coma! | ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक कोमात!

ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक कोमात!

Next

तालुक्यातील ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, गावात आलेल्या पथकास स्थानिक लोकांचा विरोध असल्याने व बऱ्याच ठिकाणी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला. प्रशासनाच्यावतीने ही मोहीम गुंडाळण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्याचबरोबर साथीच्या आजारांचा समूळ नाश व्हावा, याकरिता देशव्यापी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्याकरिता अनुदान दिले. ज्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले. परंतु, त्याचा वापर होणे आवश्यक असताना मात्र, बहुतांश ग्रामस्थांकडून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक गावांत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा हागणदारीचे साम्राज्य पसरले असल्याने गावात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या मनात गुडमॉर्निंग पथकाची धास्ती बसली असल्याकारणाने ग्रामस्थ शौचालयाचा वापर करीत होते. परंतु, आता अशाप्रकारची भीती ग्रामस्थांच्या मनात राहिली नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारची दखल घेतली जात नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरी पूर्वीप्रमाणेच गुडमॉर्निंग पथकाकडून अशा ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बॉक्स

गावात प्रवेश करताच सुटते दुर्गंधी

पावसाळा सुरू झाला असून, आता ग्रामीण भागात सद्यस्थितीत बाहेरून गावात प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर जात असताना दुर्गंधी सुटत असल्याने गावकऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत असल्याचे चित्र आहे. काही लोकांमुळे गावात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरीच मंडळी उघड्यावर शौच करीत आहेत.

बॉक्स

शौचालयांमध्ये भरतात भंगार

वैयक्‍तिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. अनेकांनी हे अनुदान मिळवण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारण्याचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्याचे काम केले, असे असल्यानंतरदेखील अनेकजण शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण तसेच भंगार ठेवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Good Morning Squad in rural areas in coma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.