ठाणा येथे बंदला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:48+5:30
केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मोर्चा काढण्यात आला. त्यात कुंदलता उके, मंजू गजभिये, मीना कांबळे, किरण शहारे, वैशाली शहारे, सुनील बन्सोड, रूपलता भागवत, रमा रामटेके, रूपा मेश्राम, भावेंद्र मेश्राम, पल्लवी सुखदेवे, रेखा तिरपुडे, आर. हाजरा, फरीब खान पठाण, अरविंद तिरपुडे, आदिल सैय्यद, शिवदास उरकुडे, अब्दुल सलाम कुट्टी, रूफीभाई, अनवर छवारे, रज्जाक शेख, अनवर छवारे, गफार छवारे, सुभाष रामटेके, शशिकांत देशपांडे, सोमेश्वर सेलोकर, नितीन तेलंग, शिवदास उरकुडे, शशीकांत भोयर, अरुण कांबळे, दिलीप उरकुडे, नदीम पठाण, फयाद शेख, मोहशीन शेख आदी सहभागी झाले होते. ठाणा येथे ९० टक्के दुकाने बंद होती.
लाखनीत बंदला संमिश्र प्रतिसाद
लाखनी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदला लाखनी येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाखनी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणेदार दामदेव मंडलवार यांना दिले. यावेळी दीपक जनबंधू, निहाल कांबळे, अतुल नागदेवे, पवन गजभिये, सचिन रामटेके, दिनेश वासनिक, मंगेश गेडाम, यासिम मिठापाणी, मोहसीन मिठापाणी, कृणाल बोरकर, साहिल शेख यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.